जाहिरात

दारुड्या नवऱ्याची रोजची कटकट; संतापलेल्या बायकोने कापलं गुप्तांग

Wife Cut The Private Part Of Husband: विष्णूचा ओरडण्याचा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांनी दरवाजा उघडला तेव्हा विष्णू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. शेजाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दारुड्या नवऱ्याची रोजची कटकट; संतापलेल्या बायकोने कापलं गुप्तांग
Wife Cut The Private Part Of Husband

Delhi Wife Crime: नवरा-बायकोमध्ये झालेल्या भांडणानंतर बायकोने नवऱ्याचं  गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील न्यू चंद्रवल परिसरातील ही घटना आहे.  शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडल्याची माहिती आहे. सध्या रूपनगर पोलिसांनी जखमी व्यक्तीला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले असून आरोपी महिला फरार असून तिचा शोध सुरू आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डीसीपी राजा बंथिया यांनी सांगितले की, 40 वर्षीय विष्णू पत्नी जगतारासोबत न्यू चंद्रवाल येथील एका घरात भाड्याने राहत होता. हे दाम्पत्य आजूबाजूच्या परिसरात मजूर म्हणून काम करायचे. त्यांची मुले गावीच राहतात. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या नवरा-बायकोमध्ये दररोज वाद आणि मारामारी होत असे. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज बाहेरही ऐकू येत असे. 

(नक्की वाचा- पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार)

शुक्रवारी रात्री देखील विष्णूने दारुच्या नशेत घरी आल्याने दोघांमध्ये भांडण सुरु झाले. भांडण इतकं विकोपाला गेलं पत्नी जगतारा हिने धारदार शस्त्राने विष्णूचं गुप्तांग कापून टाकलं. त्यानंतर तिने बाहेरून दरवाजा बंद केला आणि पळ काढला. 

( नक्की वाचा :  मालाडचा तरुण कामासाठी कल्याणमध्ये आला, भर रस्त्यात घडला भयंकर प्रकार! )

दरम्यान, विष्णूचा ओरडण्याचा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांनी दरवाजा उघडला तेव्हा विष्णू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. शेजाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी विष्णूला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: