Twitter down : आज पुन्हा एकदा एक्स डाऊन झाल्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. २४ तासात चौथ्यांदा एक्स डाऊन झालं आहे. त्यामुळे एक्सवर एम्बेड कोड काढण्यापासून अनेक गोष्टींमध्ये अडथळा होत आहे. सोमवारीही वापरकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काल 10 मार्चला रात्री एक्सवरुन काहीही शोधणं शक्य होत नव्हतं. दरम्यान यामागील कारण अखेर समोर आले आहे. एक्सवर मोठा सायबर हल्ला झाला होता, त्यामुळे सर्व सेवा ठप्प झाल्याचं सांगण्यात येत आहे. एक्सचे एलॉन मस्क यांनी पोस्ट करीत याबाबत माहिती दिली. या सायबर हल्ल्यामागे कोणी समूह किंवा देशाचा हात असल्याचा आरोप मस्क यांच्याकडून करण्यात आला आहे. एक्सवर हल्ला करण्यामागे युक्रेनचा हात असल्याचं एलॉन मस्क यांचा आरोप आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एलन मस्क काय म्हणाले...
एक्सवर एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामागे कोण जबाबदार आहे, याचा शोध घेतला जात आहे. आमच्यावर दररोज हल्ला होतोय, मात्र यंदाचा हल्ला बऱ्याच संसाधनांच्या मदतीने करण्यात आला होता. यामध्ये कोणी समूह किंवा देश सामील असल्याचं मस्क यांनी सांगितलं. याचा शोध घेतला जाईल असंही ते यावेळी म्हणाले. देशभरातून सर्वच वापरकर्त्यांचे एक्स अकाऊंट डाऊन होती, अशी माहिती आहे.
नक्की वाचा - lalit modi citizenship : ललित मोदीला ना घर ना दार; आनंदावर पडलं विरजण, वानुआतु सरकारने वाढवलं टेन्शन
दिवसभरात तीन वेळा हल्ल्याचा परिणाम दिसून आल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर प्रत्येक वेळी एक तास ट्विटर डाऊन होतं. आजही काही जणांचे एक्स डाऊन असल्याची माहिती आहे.