
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी भारतासोबत चर्चेसाठी एक नवीन डाव टाकला आहे. गुरुवारी शाहबाज शरीफ म्हणाले की, भारतासोबतच्या चर्चेसाठी सौदी अरब एक तटस्थ (न्यूट्रल) ठिकाण असेल. टीव्ही पत्रकारांशी बोलताना शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, भारतासोबत चर्चा केल्यास त्यांचे 4 अजेंडे असतील - काश्मीर, पाणी, व्यापार आणि दहशतवाद. तर दुसरिकडं, भारताने सातत्याने पाकिस्तानसोबत चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (PoK) यावरच होईल, असं स्पष्ट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत पाकिस्तानचे डावपेच ?
ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) भारताच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारताला चर्चेसाठी सौदी अरबचा प्रस्ताव का दिला आहे, यामागेही मोठे डावपेच आहेत. खरे तर, पाकिस्तानी आता भारतासोबतचे संबंध सामान्य करण्यासाठी इस्लामिक नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतासोबतच्या चर्चेवर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा खूप गरजेची आहे. यासाठी सौदी अरब एक तटस्थ जागा असू शकते.
आखादी देशांमध्ये सौदी अरबची गणना सर्वोच्च इस्लामिक देशांमध्ये होते. सौदी अरबचे दोन्ही देशांशी (भारत-पाकिस्तान) संबंधही चांगले आहेत. पण सौदी अरेबिया हे इस्लामिक राष्ट्र असल्यानं ते या चर्चेसाठी अधिक उपयुक्त असेल, असं पाकिस्तानला वाटत असावं.
( नवी वाचा : Pakistan News : तुकडे-तुकडे पाकिस्तान! स्वतंत्र बलुचिस्ताननंतर आता सिंधुदेशाची मागणीही तीव्र, वाचा सविस्तर )
टीव्ही पत्रकारांशी बोलताना शाहबाज शरीफ यांनी चीनमध्ये चर्चेसंबंधित प्रश्नावर सांगितले की, भारत यासाठी कधीच तयार होणार नाही. पण सौदी अरबचे नाव घेताना ते म्हणाले की, सौदी अरबमध्ये दोन्ही देश एकत्र बसून चर्चा करू शकतात. भारतही यासाठी राजी होऊ शकतो.
भारताची भूमिका काय?
दुसरीकडे, भारताने सुरुवातीपासूनच हे स्पष्ट केले आहे की, भारत-पाक चर्चेत कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका स्वीकारली जाणार नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा हा नवीन डाव अपयशी ठरणार हे निश्चित आहे. ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईच्या वेळीही पाकिस्तानने सौदी अरबसह इतर आखाती देशांना भारत-पाकिस्तानमधील तणाव संपवण्यासाठी आवाहन केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world