
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी थेट देशाच्या लष्करप्रमुखांना (Pakistani Army) इशारा दिला आहे. इम्रान यांनी त्यांची पत्नी बुशरा बिवीच्या (Bushra Bibi) अटकेसाठी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Army chief General Asim Munir ) जबाबदार असल्याचा आरोप केलाय.
अवैध लग्नाच्या प्रकरणात बुशरा बिबी दोषी
49 वर्षांच्या बुशरा बिवी या भ्रष्टाचारासह 71 वर्षांच्या इम्रान खान यांच्याशी अवैध लग्न केल्याच्या आरोपात दोषी आहेत. इस्लामाबादच्या उपनगरातील 'बानी गाला' या त्यांच्या घरात त्यांना कैद ठेवण्यात आलं आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवर मोठी पोस्ट लिहून लष्करप्रमुखांना इशारा दिलाय. त्यांनी आदियाला जेलमधून पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर आरोप केले आहेत.
रामनवमीला गालबोट, 'जय श्रीराम' घोषणा दिली म्हणून रॉडनं मारहाण
'माझ्या पत्नीला देण्यात आलेल्या शिक्षेला असीम मुनीर जबाबदार आहेत,' असं इम्रान यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांना दोषी ठरवण्यासाठी मुनीर यांनी न्यायाधिशांवर दबाव टाकला, असा दावाही इम्रान यांनी केला. 'देशात जंगलराज आहे. जंगलाच्या राजाला वाटलं तर नवाज शरीफ यांना सर्व प्रकरणातून माफ केलं जातं. त्याला वाटलं तर आम्हाला पाच दिवसांमध्ये तीन प्रकरणात शिक्षा सुनावली जाते,' असा आरोप इम्रान यांनी केला.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेऊन नाही तर गुंतवणुकीतून स्थिर होईल. 'जंगली कायद्यांमुळे देशात कुणीही गुंतवणूक करणार नाही. सौदी अरेबिया येतोय ही चांगली गोष्ट आहे. पण, देशात कायद्याचं राज्य आल्यानंतरच गुंतवणूक येईल, ' असं खान यांनी सांगितलं.
दुबईत पावसाचा हाहाकार, वर्षभराचा पाऊस एकाच दिवशी
पोटनिवडणूक लढवण्यापासून अटकाव
इम्रान खान यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ला पोटनिवडणूक लढवण्यापासून अडवलं जात असल्याचा आरोप केला. 'सध्या अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं म्हणजेच जिहाद आहे. आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक मतांचं संरक्षण करायचं आहे.' इम्रान खान यांच्या या गंभीर आरोपांवर पाकिस्तानी लष्ककरानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world