जाहिरात

Shashi Tharoor : ओसामा बिन लादेन आठवतोय ना? ट्रम्प-मुनीर भेटीवर थरुर यांचा अमेरिकेला थेट सवाल

Shashi Tharoor News : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी ओसामा बिन लादेनची अमेरिकन नागरिकांना आठवण करुन दिली आहे.

Shashi Tharoor : ओसामा बिन लादेन आठवतोय ना? ट्रम्प-मुनीर भेटीवर थरुर यांचा अमेरिकेला थेट सवाल
Shashi Tharoor News : पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला ट्रम्प यांनी मान दिल्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत.
मुंबई:

अमेरिकेच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला हा 2001 साली न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झाला होता. या हल्ल्यात 3,000 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमधील लष्करी छावणीजवळच सापडला होता. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी या इतिहासाची आठवण अमेरिकन नागरिकांना करुन दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

बुधवारी (18 जून रोजी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासोबत जेवणाचे निमंत्रण स्वीकारले. पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी नंदनवन समजले जाते. विशेषत: भारतविरोधी दहशतवाद्यांचा पाकिस्तान मोठा अड्डा आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कराची मदत असते, हे देखील आता लपून राहिलेले नाही. त्याच पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला ट्रम्प यांनी मान दिल्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. या सर्व विषयावर थरुर यांनी लादेनची आठवण अमेरिकेला करुन दिली आहे. 

'पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला भेटलेल्या काही सिनेटर्स आणि काँग्रेसजनांनी (या विषयावर) चर्चा केली असेल, पण अमेरिकेतील लोक ओसामा प्रकरण इतक्या लवकर विसरले नसतील. हा माणूस लष्करी छावणीजवळ सापडेपर्यंत पाकिस्तानने त्याला आश्रय दिला होता. पाकिस्तानचा हा दोष अमेरिकन नागरिक इतक्या सहज माफ करू शकत नाहीत,' असे थरुर म्हणाले.

Iran-Israel Conflict भयंकर विध्वंस होणार? इराणच्या अण्विक तळावर बॉम्ब फुटला तर काय होईल?

( नक्की वाचा : Iran-Israel Conflict भयंकर विध्वंस होणार? इराणच्या अण्विक तळावर बॉम्ब फुटला तर काय होईल? )

दुटप्पी पाकिस्तानी प्रशासनावर विश्वास ठेवू नका असा हा स्पष्ट इशारा होती. कारण त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला आश्रय दिला होता आणि ते भारतावरील दहशतवादी हल्ल्यांनाही पाठिंबा देत आहेत, असंही थरुर यांनी स्पष्ट केले. 

थरूर पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संधीचा उपयोग लष्करप्रमुखांना 'आपल्या देशात (भारतात) त्यांच्या भूमीतून दहशतवाद्यांना पैसा पुरवणे, शस्त्रे पुरवणे, प्रशिक्षण देणे आणि पाठवणे' या विरोधात इशारा देण्यासाठी केला असेल अशी त्यांना आशा आहे. 'मला आशा आहे की, जनरलना जेवण-खाण मिळत असताना, त्यांना हा संदेश मिळाला असतील... कारण ते अमेरिकेच्या हिताचेही असेल, असे थरुर यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प-मुनीर यांच्या भेटीच्या वेळेबद्दलही भारतात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. जनरल मुनीर यांची व्हाईट हाऊस भेट ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी नियोजित होती. कॅनडामधील G7 परिषदेतून बोलताना पंतप्रधान  मोदींनाही व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आले होते, परंतु पंतप्रधान मोदींनी हे आमंत्रण नाकारले.

मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी काश्मीरवरील पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याचा मुद्दा सोडवण्यासाठी भारत कधीही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थची मागणी करणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना ठासून सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com