IND vs PAK, Asia Cup 2025 Final LIVE: भारत आणि पाकिस्तान यांच्या आशिय चषकच्या फायनलमध्ये मुकाबला होत आहे. या स्पर्धेत भारताने या आधी दोन्ही सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली आहे. आता फायनलमध्ये हे दोन्ही संघ एकमेकां समोर ठाकले आहेत.
IND vs PAK Final: भारताने आशिय चषक जिंकला
IND vs PAK Final: भारताने आशिय चषक जिंकला आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना खेचला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी दहा धावांची गरज होती. दहाव्या ओव्हर्सच्या दुसऱ्या बॉलवर तिलक वर्माने षटकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. त्यानंतर रिंकू सिंहने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्हतब केले. या विजयासह भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. तिलक वर्मा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद 69 धावा केल्या. त्याला संजू सॅमसन आणि शिवम दुबेची चांगली साथ मिळाली. शिवमने शेवटी 22 बॉल मध्ये 33 धावा ठोकल्या. भारताची सुरूवातीला वाईट स्थिती झाली होती. अभिषेक शर्मा, सुर्यकुमार यादव आणि शुभमन गील हे लागोपाठ आऊट झाले. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात चांगली भागीदारी झाली. शेवटी भारताने पाकिस्तानचा आणखी एकदा पराभव करत आशिया चषकावर आपले नाव कोरले.
IND vs PAK Final: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रडवून रडवून हरवलं
IND vs PAK Final: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रडवून रडवून हरवलं
IND vs PAK Final LIVE: भारताला पाचवा झटका
IND vs PAK Final LIVE: भारताला पाचवा झटका मिळाला आहे. शिवम दुबे शेवटच्या क्षणी आऊट झाला आहे. भारताला आणखी दहा धावांची गरज आहे.
IND vs PAK Final LIVE: भारतला 12 चेंडूत 17 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारतला आता 12 चेंडूत 17 धावांची गरज आहे. मॅच अतिशय रोमांचक मोडवर आहे. भारताच्या हातात आणखी सहा विकेट आहेत.
IND vs PAK Final LIVE: भारत पाकिस्तान मॅच रोमांचक मोडवर, विजयासाठी 31 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारत पाकिस्तान मॅच रोमांचक मोडवर, विजयासाठी 31 धावांची गरज, तीन ओव्हर्स शिल्लक
IND vs PAK Final LIVE: तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण, विजयासाठी आखणी 36 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण, विजयासाठी आखणी 36 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारताला 24 बॉलमध्ये 36 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारताला 24 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. चार ओव्हर्स शिल्लक आहेत.
IND vs PAK Final LIVE: भारताच्या 100 धावा पूर्ण, विजयासाठी आणखी 47 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारताच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. आता विजयासाठी आणखी 47 धावांची गरज आहे. पाच ओव्हर्स शिल्लक आहेत.
IND vs PAK Final LIVE: भारताला चौथा झटका, संजू सॅमसन आऊट
IND vs PAK Final LIVE: भारताला चौथा झटका, संजू सॅमसन आऊट झाला आहे. त्याने चोविस धावा केल्या.
IND vs PAK Final LIVE: भारताला जिंकण्यासाठी आणखी 78 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारताला जिंकण्यासाठी आणखी 78 धावांची गरज आहे. आणखी नऊ ओव्हर्स शिल्लक आहेत. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन मैदानात आहे. तिलक वर्मा 34 धावांवर खेळत आहे.
IND vs PAK Final LIVE: दहा ओव्हर्स नंतर भारताच्या 58 धावा
IND vs PAK Final LIVE: दहा ओव्हर्स नंतर भारताच्या 58 धावा झाल्या आहेत. आता भारताला आणखी दहा ओव्हर्समध्ये 89 धावांची आवश्यकता आहे.
IND vs PAK Final LIVE: संजू सॅमसनचा सोपा कॅच सोडला
IND vs PAK Final LIVE: संजू सॅमसनचा सोपा कॅच सोडला आहे. त्याला 12 धावांवर खेळत असताना जिवदान मिळाले आहे. सैम अयुबच्या बॉलिंगवर त्याला जिवदान मिळाले.
IND vs PAK Final LIVE: भारताला 12 ओव्हर्समध्ये 72 धावांची गरज
IND vs PAK Final LIVE: भारताला 12 ओव्हर्समध्ये 72 धावांची गरज आहे. भारताचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. भारताने आठ ओव्हर्समध्ये 49 धावा केल्या आहेत.
IND vs PAK Final LIVE: पावर प्लेमध्ये भारताच्या 36 धावा
IND vs PAK Final LIVE: पावर प्लेमध्ये भारताच्या 36 धावा झाल्या आहे. भारताच्या पावर प्लेमध्ये तीन विकेट गेल्या आहेत. सध्या संजू सॅमसन आणि तिलक वर्मा मैदानात आहेत.
IND vs PAK Final LIVE: भारताला तिसरा झटका, सुर्या पाठोपाठ शुभमन गिल ही आऊट
IND vs PAK Final LIVE: भारताला तिसरा झटका बसला आहे. सुर्या पाठोपाठ शुभमन गिल ही आऊट झाला आहे. भारताची अवस्था तीन बाद वीस झाली आहे. चार ओव्हर्स झाल्या आहेत.
IND vs PAK Final LIVE: भारताला दुसरा झटका, कॅप्टन सुर्या आऊट
IND vs PAK Final LIVE: भारताला दुसरा झटका बसला आहे. कॅप्टन सुर्यकुमार यादव एक धाव काढून आऊट झाला आहे. अभिषेक शर्मानंतर तो लगेच बाद झाला. भारताची धावसंख्या दहा धावांवर दोन आऊट अशी झाली आहे.
IND vs PAK Final LIVE: भारताला पहिला झटका, अभिषेक शर्मा आऊट
IND vs PAK Final LIVE: भारताला पहिला झटका मिळाला आहे. अभिषेक शर्मा पाच धावा करून आऊट झाला आहे. पाकिस्तानने भारतला विजयासाठी 147 धावांचे आव्हान दिले आहे. फईमने अभिषेक शर्माला आऊट केले. सात धावांवर भारताची पहिली विकेट गेली.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तान 146 धावांवर ऑलआऊट, 20 ओव्हर्सही खेळता आल्या नाही
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तान 146 धावांवर ऑलआऊट, 20 ओव्हर्सही खेळता आल्या नाही
आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानचा प्रथम फलंदाजी करताना 146 धावांत ऑलआऊट झाला आहे. पाकिस्तानच्या संघाला संपूर्ण वीस ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. पाकिस्तानकडून सुरूवात चांगली झाली होती. फरहान आणि फखर जमान यांनी 84 धावांची सलामी दिली होती. पाकिस्तानच्या 113 धावांवर दोन फलंदाज बाद झाले होते. सहाबजादा फरहानने 57 धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर मात्र पाकिस्तानचा डाव गडगडला. एका ही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. जणू आऊट होण्याची स्पर्धा पाक फलंदाजात लागली होती. भारताकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर बुमरा, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताला आता विजयासाठी 147 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
IND vs PAK Final LIVE: 27 धावांत पाकिस्तानचे 7 फलंदाज बाद
पाकिस्तानने सत्ताविस धावा मध्ये सात विकेट गेल्या आहे. पाच ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या सात विकेट गेल्या आहेत. संपूर्ण सामना फिरला आहे. एक वेळ पाकिस्कानच्या धावांचे शतक झाले होते. शिवाय एकही फलंदाज बाद झाला नव्हता. मात्र नंतर पाकिस्तानचा डाव कोसळला आहे.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानच्या बॅट्समनमध्ये आऊट होण्याची स्पर्धा, 8 जण बाद
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानच्या बॅट्समनमध्ये आऊट होण्याची स्पर्धा, 8 फलंदाज बाद झाले आहेत. कुलदीप यादवने चार फलंदाजांना बाद केले आहे. फहीम अशरफ ही शाहीनशहा आफ्रीदी प्रमाणे शुन्यावर बाद झाला आहे.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानचा डाव कोसळला, 7 वी विकेट ही पडली
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानचा डाव कोसळला, 7 वी विकेट ही पडली शाहीनशहा आफ्रीदी शुन्य धावांवर बाद झाला. त्याला कुलदीप यादवने आऊट केले.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानची सहावी विकेटही पडली 133 वर 6 बाद
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानची सहावी विकेटही पडली 133 वर 6 बाद कॅप्टन सलमान अली आगा आठ धावा काढून बाद झाला आहे. त्याला कुलदिप यादवने बाद केले. त्याच्या बॉलिंगवर संजू सॅमसनने जबरदस्त कॅच पकडला. 113 वर 1 बाद असलेल्या पाकिस्तानची अवस्था 133 वर 6 बाद झाले आहेत.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानचा डाव कोसळला, निम्मी टीम तंबूत परतली
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानचा डाव कोसळला, निम्मी टीम तंबूत परतली, हुसेन तलत आऊट झाला आहे. त्याला अक्षर पटेलने बाद केले. त्याला फक्त एक धाव करता आली. मधली फळी पाकिस्तानची कोलमडली आहे.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानची चौथी विकेट पडली, फखर जमान आऊट
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानची चौथी विकेट पडली आहे. अर्थशतकाच्या जवळ पोहोचलेला फखर जमान आऊट झाला आहे. त्याला वरुण चक्रवर्तीने आऊट केले. पाकिस्तानच्या १२६ धावा झाल्या आहेत.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानला तिसरा झटका, सैम पाठोपाठ हारिस आऊट
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानला तिसरा झटका बसला आहे. सैम आयुब पाठोपाठ हारिस शुन्यावर आऊट झाला आहे. त्याला अक्षर पटेलने बाद केले.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानला दुसरा झटका, सैम आयुब आऊट
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानला दुसरा झटका बसला आहे. सैम आयुब आऊट झाला आहे. त्याला कुलदीप यादवने बाद केले. त्याचा झेल बुमराने पकडला. त्याल चौदा धावा करता आल्या.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानच्या धावांचे शतक पूर्ण, 12 ओव्हरमध्ये 100
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानच्या धावांचे शतक पूर्ण, 12 ओव्हरमध्ये 100
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानला पहिला झटका, साहिबजादा 57 धावांवर बाद
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानला पहिला झटका, साहिबजादा 57 धावांवर बाद झाला आहे. त्याला वरूण चक्रवर्तीने बाद केले आहे. पाकिस्तानची धावसंख्या 84 झाली आहे.
IND vs PAK Final LIVE: साहिबजादा फरहानच्या 50 धावा पुर्ण, पाकिस्तान बिनबाद 77
IND vs PAK Final LIVE: साहिबजादा फरहानच्या 50 धावा पुर्ण, पाकिस्तान बिनबाद 77, नऊ ओव्हर्सनंतरही पाकिस्तानची एकही विकेट गेलेली नाही. फरहानने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानच्या पन्नास धावा पूर्ण
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानच्या पन्नास धावा पूर्ण झाल्या आहेत. सातव्या ओव्हर नंतर पाकिस्तानची धावसंख्या 57 झाली आहे.
IND vs PAK Final LIVE: पावर प्लेमध्ये पाकिस्तानने केल्या 45 धावा
IND vs PAK Final LIVE: पावर प्लेमध्ये पाकिस्तानने केल्या 45 धावा, सहा ओव्हरमध्ये पाकिस्तानने पंचेचाळीस धावा केल्या आहे. भारताला एकही विकेट मिळालेली नाही.
IND vs PAK Final LIVE: 5 ओव्हर्सनंतर पाकिस्तान बिनबाद 37
IND vs PAK Final LIVE: 5 ओव्हर्सनंतर पाकिस्तान बिनबाद 37 धावसंख्या झाली आहे. फरहान सव्वीस धावांवर तर इमान नऊ धावांवर खेळत आहे.
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानची सावध सुरूवात, चार ओव्हरमध्ये 30 धावा
IND vs PAK Final LIVE: पाकिस्तानची सावध सुरूवात, चार ओव्हरमध्ये 30 धावा केल्या आहेत. बुमराच्या चौथ्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि एक फोर लगावला.
IND vs PAK Final LIVE: तिसऱ्या ओव्हरनंतर पाकिस्तान बिनबाद 19
IND vs PAK Final LIVE: तिसऱ्या ओव्हरनंतर पाकिस्तान बिनबाद 19 धावा केल्या आहेत. शिवम दुबेने आपली दुसरी ओव्हरही टाईट टाकली आहे.
IND vs PAK Final LIVE: दुसऱ्या ओव्हरनंतर पाकिस्तान बिनबाद 11
IND vs PAK Final LIVE: दुसऱ्या ओव्हरनंतर पाकिस्तान बिनबाद 11, बुमराच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सात धावा काढल्या गेल्या. त्यात एक चौकार होता.
IND vs PAK Final LIVE: पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने केल्या चार धावा
IND vs PAK Final LIVE: शिवम दुबेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांना केवळ चार धावा करता आल्या. फरहानने एक चौकार लगावला होता.
IND vs PAK Final LIVE: शिवम दुबेकडून भारतीय बॉलिंगची सुरूवात
IND vs PAK Final LIVE: शिवम दुबेकडून भारतीय बॉलिंगची सुरूवात
IND vs PAK Final LIVE: भारत पाकिस्तान मॅचला सुरूवात
IND vs PAK Final LIVE: भारत पाकिस्तान मॅचला सुरूवात झाली आहे. मॅचच्या आधी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाले.
IND vs PAK Final LIVE: भारताने टॉस जिंकला, पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय
IND vs PAK Final LIVE: भारताने टॉस जिंकला, पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय
भारताने टॉस जिंकला आहे. आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. रिंकू सिंह आणि शिवम दुबे हे संघात आले आहेत. तर हार्दीक पंड्या आणि अर्थदीप हे बाहेर आहेत.
IND vs PAK Final LIVE:फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; हार्दिक पांड्या बाहेर, रिंकू सिंहला संधी?
IND vs PAK Final LIVE:फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; हार्दिक पांड्या बाहेर, रिंकू सिंहला संधी?
अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आजचा महत्त्वाचा सामना खेळत नाहीये. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्याच ओव्हरनंतर हार्दिकने मैदान सोडले होते. दुखण्यामुळे तो पुन्हा मैदानात येऊ शकला नाही. मैदानातून मिळत असलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याच्या जागी युवा फलंदाज रिंकू सिंहला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
IND vs PAK Final LIVE: भारत-पाकिस्तान फायनलपूर्वी नवा ट्विस्ट
अंतिम सामन्यापूर्वी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, टॉसच्या वेळी रवि शास्त्री हे भारतीय कर्णधाराशी बोलतील, तर वकार युनूस हे पाकिस्तानी कर्णधाराशी संवाद साधतील. यासाठी दोन समालोचक उपस्थित राहणार आहेत.
IND vs Pak Live- भारत पाकिस्तान फायनल आधी चाहत्यांचा उत्साह
IND vs Pak Live- भारत पाकिस्तान फायनल आधी चाहत्यांचा उत्साह
#WATCH | Dubai, UAE | Sudhir Kumar Chaudhary, team India's supporter and fan of Cricket legend Sachin Tendulkar, waves the Indian flag outside Dubai International Stadium ahead of India's match against Pakistan in the finals of the Asia Cup 2025. pic.twitter.com/gJHrsCOf9Z
— ANI (@ANI) September 28, 2025
IND vs PAK Final LIVE: फायनलसाठी टीम इंडिया स्टेडियममध्ये पोहोचली
IND vs PAK Final LIVE: फायनलसाठी टीम इंडिया स्टेडियममध्ये पोहोचली
पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या निर्णायक अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्टेडियमवर दाखल झाली आहे. स्टेडियममध्ये भारतीय चाहते मोठ्या संख्येने आले आहेत. स्टेडियममध्ये निळा समुद्र पाहायला मिळत आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी भारतीय चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये दाखल झाले असून, ते आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत.
#WATCH | Dubai, UAE: Indian Cricket Team arrive at the Dubai International Stadium for their match against Pakistan in the finals of the Asia Cup 2025. pic.twitter.com/RakQjDxLUi
— ANI (@ANI) September 28, 2025
IND vs PAK Final LIVE: थोड्याच वेळात भारत पाकिस्तान सामन्याला सुरूवात होणार
IND vs PAK Final LIVE: थोड्याच वेळात भारत पाकिस्तान सामन्याला सुरूवात होणार आहे. जवळपास 41 वर्षानंतर पाकिस्तानचा संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आशिया चषकाच आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचेच वर्चस्व राहीले आहे. आता पर्यंत आशिय चषकात पंधरा सामने खेळले गेले आहेत. त्यातील 12 सामने भारताने जिंकले आहेत तर तिन सामन्या पाकिस्तानला जिंकता आले आहे.
IND vs PAK Final LIVE: भारत- पाकिस्तानमध्ये ब्लॉकबास्टर मुकाबला, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
IND vs PAK Final LIVE: भारत- पाकिस्तानमध्ये ब्लॉकबास्टर मुकाबला होत आहे. आशिय चषकाच्या फायनलसाठी हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे.
भारतीय टीम: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सैमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, जितेश शर्मा, शिवम दुबे
पाकिस्तान टीम: साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अयूब, सलमान आगा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, अबरार अहमद, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद मुहम्मद वसीम.