1 day ago

महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पाच डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेते, सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आज मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

Dec 02, 2024 21:58 (IST)

Live Update : MTNL/BSNL च्या इमारतींच्या पुनर्विकासात घोटाळा

MTNL/BSNL च्या इमारतींच्या पुनर्विकासात घोटाळा

सरकार MTNL चा गळा घोटतंय

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा केंद्र सरकारवर आरोप

अरविंद सावंत यांचा ट्विट करता आरोप

बजेटमध्ये दिलेला पैसा नेमका कुठे गेला? अरविंद सावंत यांचा सवाल


Dec 02, 2024 21:36 (IST)

Live Update : सराफा दुकानावर चोरट्याचा डल्ला, रोख रकमेसह 12 लाखांचा मुद्देमाल लंपास

पुसद तालुक्यातील शेबाळपिपरी येथील मुख्य बाजारपेठेतील वैष्णवी ज्वेलर्सचे रात्री 12 वाजता चोरट्यानी शटर तोडून रोख 30  हजाराच्या रक्‍कमेसह 12 लाख 48 हजाराचे सोन्या चांदीचे दागीने लंपास केले आहे  येथील कैलास दामोदर टाक याच्या वैष्णवी ज्वेलर्स मध्ये रात्री 12 वाजता ही धाडसी चोरी झाली आहे तिजोरी फोडून अवघ्या 12 मिनिटात  चोरट्यांनी रोख रक्‍कमेसह पाच किलो चांदीचे आणि 124 ग्रॅम सोन्याचे विविध दागीण्यांवर हात साफ केला आहे. साधारण 5 चोरटे रात्री दुकानात  शिरल्याचे सिसिटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहेत या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Dec 02, 2024 21:35 (IST)

Live Update : ट्रॅक्टर आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक, अपघातात ३ जण गंभीर जखमी

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व लक्झरी बसचा समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघात ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सिन्नर - शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळील खंडोबा मंदिरासमोर घडली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.जखमींना उपचारार्थ तातडीने कोपरगाव येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही अघातामुळे शिर्डी सिन्नर वाहतूक विस्कळीत झाली असून वावी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल असून मदत कार्य सुरू केले आहे.

Dec 02, 2024 19:47 (IST)

Live Update : भाजपचे संकटमोचक एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुख्यमंत्रिपदावरुन सुरू असलेल्या वादानंतर पहिल्यांदा कोणताही भाजप नेता हा एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत..

गिरीश महाजन हे एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी गेल्याची चर्चा आहे...

Advertisement
Dec 02, 2024 18:43 (IST)

Live Update : अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता - सुनील तटकरे

अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता...

आमची अमित शाह यांच्यासोबत यापूर्वीच बैठक झाली आहे. 

दोन निरीक्षक भाजपने नेमले आहेत.

किती मंत्रीपदं मिळतील हे नंतर कळेल.

Dec 02, 2024 18:42 (IST)

Live Update : हर्सूल जेलजवळ दोन गटात हाणामारी, एकावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

हर्सूल जेलजवळ दोन गटात हाणामारी, एकावर चाकूने हल्ला 

चाकू हल्ल्यात दिलीप मोरे तरुणाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस घटनास्थळी दाखल 

पोलीस येताच दोन्ही गट घटनास्थळावरून पसार 

शुल्लक कारणावरून चाकू झाल्याची प्राथमिक माहिती; पोलिसांचा तपास सुरू

Advertisement
Dec 02, 2024 18:05 (IST)

Live Update : शपथविधी समारंभ आझाद मैदानात न घेता राजभवनावर घ्यावा - भीम आर्मी

5 डिसेंबर रोजी होणारा शपथविधी समारंभ आझाद मैदानात न घेता राजभवनावर घ्यावा यासाठी भीम आर्मी आणि एडवोकेट सिद्धार्थ इंगळे यांचे राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना पत्र. 6 डिसेंबर रोजी असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता आझाद मैदानात शपथविधी न घेता तो राजभवन येथे घ्यावा ही पत्रात विनंती...

Dec 02, 2024 17:39 (IST)

Live Update : आमदार उत्तम जानकर यांचा प्रशासनाला थेट इशारा

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात प्रांताधिकार्‍यांनी आज पासून 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे तरीसुद्धा आमदार उत्तम जानकर यांनी गावात ठाण मांडलेला आहे.प्रशासनानं जमावबंदी लागू केली काय... लाठी चार्ज केला काय... आणि बंदुकीच्या गोळ्या घातल्या काय... कोणत्याही परिस्थितीत उद्या मतदान प्रक्रिया पार पाडू. असे म्हणत आमदार जानकर यांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

Advertisement
Dec 02, 2024 17:02 (IST)

Live Update : तिघेजण रस्ता चुकल्याने खोल दरीत अडकले, सुटकेचा थरार मोबाईल कॅमेरात कैद

वरळीवरून खारघर येथे ट्रेकिंगसाठी गेलेले तिघेजण रस्ता चुकल्याने खोल दरीत अडकले...

तळोजा कारागृहामागील डोंगरावर तिघेही ट्रेकिंगसाठी गेले होते.

डोंगरावर गेल्यावर रस्ता चुकल्याने तिघेही खोल दरीत अडकले.

पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली.

सुटकेचा थरार मोबाईल कॅमेरात कैद.

Dec 02, 2024 16:50 (IST)

Live Update : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचा आदेश

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्याची 2 डिसेंबर 2024 रोजी सुनावणी झाली.राहुल गांधी हे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने आजच्या सुनावणीसाठी हजर राहू शकले नाही अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारी ठेवण्यात आली असून 10 तारखेला राहुल गांधी यांना स्वतः हजर राहण्याचे पुणे सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Dec 02, 2024 16:12 (IST)

Live Update : 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेननाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेननाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार 

आयोजक संस्थेने शरद पवारांना यासाठी विनंती केली होती

ती विनंती पवारांनी मान्य केली

या आधी पवारांनी औरंगाबाद, नाशिक, चिपळूण, सासवडला झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागतध्यपद स्वीकारले होते

Dec 02, 2024 16:09 (IST)

Live Update : अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार...

फडणवीसांसह अनेक नेते दिल्लीला रवाना होणार असल्याची शक्यता

खातेवाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता...

Dec 02, 2024 15:05 (IST)

Live Updates: सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती

विधानभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून पक्षाचा गटनेता निवडला जाणार असून केंद्रातून विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमण निरीक्षक म्हणून काम पाहण्यासाठी राज्यात येणार आहेत. 

Dec 02, 2024 14:56 (IST)

Avinash jadhav MNS: राज ठाकरेंचा आदेश, अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे

मनसे नेते अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेत असल्याची अविनाश जाधव यांची माहिती. आता अविनाश जाधव पुन्हा ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून करणार काम. इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा कधीच विचार करणार नसल्याची अविनाश जाधव यांची माहिती 

Dec 02, 2024 13:45 (IST)

Maharashtra Government Oath Ceremony: शपथविधी सोहळ्याच्या तयारीकडे शिंदे गटाने फिरवली पाठ, भाजप-सेनेतील वाद चव्हाट्यावर

शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार उपस्थित होते

राष्ट्रवादी कडून शिवाजी गर्जे देखील उपस्थित होते

शिवसेना शिंदे कटाकडून एकही आमदार किंवा प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते

त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा हा वाद चव्हाट्यावर आलेला पहायला मिळतो

Dec 02, 2024 12:50 (IST)

Sanjay Raut News: गृहखाते शिवसेनेकडे असते तर आमचं सरकार पडलं नसतं: संजय राऊत

सरकारमध्ये दुसऱ्या नंबरचं खातं गृहखाते आहे. मुख्यमंत्री गृहखाते आपल्याकडे ठेवतो. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याकडे ठेवलेले आहे. जेव्हा जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी पूर्वी करायचो, तेव्हा ते सांगायचे. उद्धव ठाकरे यांनी गृहखाते दुसऱ्या पक्षाला देण्याची चूक करू नये, आमचेही तेच म्हणणं होतं. कारण गृहखाते, विधानसभेचे अध्यक्षपद हे त्या काळात संवेदनशील विषय होते त्यामुळे गृहखातं जर आमच्याकडे असतं तर आमचं सरकार पडलं नसतं असं मोठं विधान संजय राऊत यांनी केले आहे. 

Dec 02, 2024 09:59 (IST)

Nashik News: नाशिकमध्ये ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण

 नाशिकमध्ये ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण

- नाशिकच्या विल्होळी फाट्यावरील काल रात्रीची घटना

- वाहतूक सुरळीत करत असताना झालेल्या वादातून टोळक्याने केली मारहाण

- शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी भरती करण्यात आले आहे खाजगी ट्रॅफिक वॉर्डन

- तुषार गांगुर्डे अस मारहाण झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनच नाव

- जखमी झालेल्या ट्रॅफिक वॉर्डन वर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

- ट्रॅफिक वार्डनला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर

- मारहाण करणाऱ्या टोळक्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

Dec 02, 2024 09:54 (IST)

Palghar News: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळल्या जिवंत अळ्या आणि बुरशी

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळल्या जिवंत अळ्या आणि बुरशी

मुलांना पुरविण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये आढळल्या जिवंत अळ्या आणि बुरशी

पालघर जिल्हा परिषदेच्या २,३७१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना पुरविण्यात येतो पोषण आहार

अनेक शाळांनी वरिष्ठांना तक्रार करूनही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या फूड पॅकेटचे वाटप सुरूच

प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेमार्फत राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडचा पुरवठा केला जातोय

ठेकेदार मे. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रा. लि. मुंबई कंपनीमार्फत केला जातोय पोषण आहाराचा पुरवठा 

अळ्या आणि बुरशी युक्त पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची पालकांची मागणी

Dec 02, 2024 08:55 (IST)

Onion Price: श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केले, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

- श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा

- 30% वरून आयात शुल्क 10 टक्के केल्याने श्रीलंका मध्ये कांदा निर्यात वाढणार

- नाशिकसह देशातील सुमारे 9 टक्के कांदा श्रीलंका मध्ये होतो निर्यात

- आयात शुल्क कमी केल्याने कांदा निर्यात वाढून कांद्याला दर देखील चांगले मिळण्याची शक्यता

- गेल्या काही दिवसांपासून सध्या कांद्याला मिळत आहेत चांगले दर

- तर येणाऱ्या काळात कांदा आवक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारने 20% असलेला कांदा निर्यात दर देखील रद्द करण्याची कांदा  उत्पादक संघटनांची मागणी

Dec 02, 2024 08:35 (IST)

Wardha News: जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात लवकरच 21 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार

जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात लवकरच 21 रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वी या रुग्णवाहिका आरोग्य यंत्रणेला मिळाल्या आहेत. १५ रुग्णवाहिका निर्लेखन असून ६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेची गरज निर्माण झाली होती. आरोग्य विभागाच्या मागणीनुसार या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका निर्लेखित झाले आहेत आणि नवीन सहा प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 21 रुग्णवाहिका लवकरच आरोग्य यंत्रणेला मिळणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगी नंतर या रुग्णवाहिका आरोग्य सेवेत सामील होतील.

Dec 02, 2024 08:15 (IST)

Live Updates: विक्रीसाठी आणलेले खवले मांजर ताब्यात

विक्रीसाठी आणलेले खवले मांजर वनविभागाच्या पथकाने आज ताब्‍यात घेतले. या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वनविभागाने पाच जणांना ताब्‍यात घेतले आहे. मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथील राजस्थानी धाबा येथे ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्‍यांमध्ये विशाल विष्णू खाडे (वय ३४ वर्ष, रा.लोरे नं. कणकवली), संदीप तानाजी घाडी (वय ४४), गिरिधर लवु घाडी (वय ४१ दोन्ही रा. मुटाट ता. देवगड) आणि गुरुनाथ धोंडु घाडी (वय ५० रा. मुटाट, ता. देवगड) यांचा समावेश आहे.

Dec 02, 2024 08:13 (IST)

Farmer News: सत्ता स्थापनेला उशिर, शेतकऱ्यांना फटका

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. राज्यभरात १९४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं, ज्यात २ लाख ५४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागात अतिवृष्टीने  नुकसान झालं. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. पण पुढे आचारसंहिता लागल्याने सरकारला निर्णय घेता आला नाही. तर आचारसंहिता लागल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला, पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आता नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाईल आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे....

Dec 02, 2024 08:13 (IST)

देशभरात संभल मस्जिद प्रकरण गाजत असताना याच प्रकरणावरून असदुद्दीन ओवैसी यांना धमक्या येत आहे. याबाबत स्वतः ओवैसी यांनी खुलासा केला आहे. मालेगाव येथील सभेत बोलत असताना आपल्याला व्हाट्सअप, एसएमएस आणि वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या येत असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत.