Maharashtra Political News :
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने लावलेल्या बॅनरवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. यावरुन मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टोला लगावला होता. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता मनसेने प्रत्युत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की,"मनसेच्या सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे यातून दिसतंय. जर महाराष्ट्रात जिंकायचं असेल, गद्दारांनी देखील बाळासाहेबांचा फोटो वापरला होता. तसाच सगळ्यांना आता बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही."
(नक्की वाचा- School Bus Fare : पालकांना झटका; एप्रिलपासून स्कूल बसचे शुल्क 10-12 टक्क्यांनी वाढणार)
उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, "माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंगवर लावणे हे पक्षाचं धोरण नाही .एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते. पण उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे की, महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय ?"
(नक्की वाचा- Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या)
बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला घशात घातला
"ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलले होते की माझे फोटो लावायचे नाहीत. तेव्हा राज साहेबांनी ठरवलं की फोटो लावायचे नाही. आतापर्यंत आम्ही ते धोरण पाळत आलो आहोत. मात्र उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली महापौर बंगला घशात घातला. खासगी जागेवर स्मारक बांधायला हवं होतं. मात्र तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली", अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
आमच्या कार्यकर्त्याचं आम्ही समर्थन करत नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे तुमचे वैयक्तिक नाहीत, ते देशाचे आहेत, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.