आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस. ठिकठिकाणी गणराज विराजमान झाले आहेत. स्वयंपाक घरांमध्ये मेजवानी सुगंध दरवळत आहे. दरम्यान पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी (Pune Ganeshotsav) दरवर्षी नेहमीच गर्दी होत असते. मात्र यादरम्यान बरेच रस्ते बंद असल्याने वाहन पार्क करण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. परिणामी रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क केल्यामुळे कारवाई किंवा वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. यासाठी गणेशोत्सवानिमित्ताने पुणे शहरात 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी आनंदात गणपतीला पाहता येईल आणि गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल. (Pune Parking)
गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात 27 ठिकाणी वाहनतळ करण्यात आलं आहे. पुण्यातील गणेशोत्सवासाठी हजारो लोक सहभागी होतात. यादरम्यान बरेचसे रस्ते बंद असल्याने त्यांना वाहने पार्क करण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. पुणे वाहतूक पोलिसांनी याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती भागात 27 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Khuni Ganpati : मौलानाच्या आरतीशिवाय होत नाही विसर्जन; काय आहे धुळ्यातील 'खुनी गणपती'चा इतिहास?
यासाठी शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, फर्ग्युसन महाविद्यालय, जैन हॉस्टेल, हमालवाडा, नारायण पेठ, BMCC रस्ता, SSPM, SP महाविद्यालय, करावे रस्ता, आणि अन्य रस्ते येथे चार चाकी पार्किंगसाठी वाहनतळ उपलब्ध असतील.
गणेशउत्सव 2024 कालावधीमध्ये तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी उपलब्ध असणाऱ्या पार्किंगबाबत.....#pune# pic.twitter.com/Yrpc0JnExT
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) September 6, 2024
याशिवाय न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, गोगटे प्रशाला, नारायण पेठ, पेशवे पार्क, सारसबाग, पार्वती ते दांडेकर पूल, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूल ते गणेश मळा, डेक्कन जिमखाना, आपटे रोड, विमलाबाई गरवारे प्रशाला आणि इतर रस्त्यांवर दुचाकी वाहनांचे पार्किंग असेल. या सर्व रस्त्यांवर गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात पार्किंगची सुविधा असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world