क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने पुण्यातील लहानग्याचा मृत्यू, दुर्दैवी घटनेचा CCTV समोर

शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे असे मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचे नाव आहे. पुण्यातील लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे असे मृत्यू झालेल्या 11 वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गुरुवारी पुण्यातील लोहगाव भागात घडली. शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. शंभूला खेळताना अचानक समोरून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. 

नक्की वाचा- भांडण सोडवायला आलेल्या दीराची भावजयीनं केली हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

काही वेळानंतर तो उठून उभा राहिला. मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला.  तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article