मुंबईतील 12 पूल धोकादायक; गणेशोत्सवादरम्यान भक्तांना काळजी घेण्याचं आवाहन

मिरवणुकीतील वाहनांनी आणि भाविकांनी एकाच वेळी पुलावर गर्दी करू नये. विसर्जन मिरवणूक हळू चालवावी आणि पुलांवर थांबू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Mumbai News : मुंबईत गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणतात आणि विसर्जनाच्या दिवशी मोठ्या मिरवणुका काढतात. परंतु, मुंबईतील जुन्या पुलांची स्थिती लक्षात घेता, या मिरवणुका सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी एक संयुक्त सूचना जारी केली आहे. या सूचनेमुळे गणेशोत्सव मंडळं आणि गणेशभक्तांना मिरवणुका सुरक्षितपणे काढण्यासाठी मदत होईल.

मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या सूचनेनुसार, मुंबईतील 12 पूल धोकादायक घोषित करण्यात आले आहेत. या पुलांवरून गणेशोत्सवाच्या मिरवणुका काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Haritalika Tritiya 2025 Wishes: शिवपार्वतीचे प्रेम म्हणजे निष्ठेचे प्रतीक! हरितालिका तृतीयेच्या खास शुभेच्छा)

मध्य रेल्वेचे पूल

  • ​घाटकोपर रेल्वे पूल (रेल्वे ओव्हर ब्रीज)
  • ​करी रोड रेल्वे पूल (रेल्वे ओव्हर ब्रीज)
  • ​साने गुरुजी मार्ग, ऑर्थर रोड येथील चिंचपोकळी रेल्वे पूल
  • ​भायखळा रेल्वे पूल (रेल्वे ओव्हर ब्रीज)

पश्चिम रेल्वेचे पूल

  • मरीन लाईन्स रेल्वे पूल (रेल्वे ओव्हर ब्रीज)
  • सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्चगेट रोडच्या मध्ये)
  • ग्रँट रोड रेल्वे पूल (ग्रँट रोड व वरळी रोडच्या मध्ये)
  • केनेडी ब्रिज (ग्रँट रोड व वरळी रोडच्या मध्ये)
  • फॉकलँड रोड रेल्वे पूल (ग्रँट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
  • महालक्ष्मी स्टेशन रेल्वे पूल
  • प्रभादेवी-करीरोड रेल्वे पूल
  • लोकमान्य टिळक रेल्वे पूल, दादर

मिरवणुकीसाठीचे नियम आणि अटी

​जे पूल धोकादायक नाहीत, त्या पुलांवरून मिरवणूक काढताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुलांवर कोणत्याही परिस्थितीत 100 पेक्षा जास्त लोक थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. तसेच, मिरवणुकीदरम्यान पुलांवर नाचणे, गाणे किंवा मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

(नक्की वाचा- Ganesh Chaturthi 2025: श्री गणेशाची 108 नावं उच्चारुन दुर्वा अर्पण करा, गणरायाकडून मिळतील मोठे लाभ)

​गणेशोत्सवासाठी अनेक मंडळं मोठ्या मूर्तींची स्थापना करतात. विसर्जनासाठी या मोठ्या मूर्तींची मिरवणूक काढली जाते. यामुळे पुलांवर जास्त भार येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन हे नियम तयार करण्यात आले आहेत. पुलांची सुरक्षा आणि गणेशभक्तांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे, सर्व गणेशोत्सव मंडळं आणि गणेशभक्तांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Advertisement

​वाहतूक पोलिसांची भूमिका

​मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेमध्ये असे म्हटले आहे की, गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांनी पुलांचा वापर करताना काळजीपूर्वक मिरवणूक काढावी. मिरवणुकीतील वाहनांनी आणि भाविकांनी एकाच वेळी पुलावर गर्दी करू नये. विसर्जन मिरवणूक हळू चालवावी आणि पुलांवर थांबू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्यास पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन नियमानुसार कारवाई करेल.

​याव्यतिरिक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका गणेशोत्सवादरम्यान देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती सहज मिळू शकेल.

Advertisement

Topics mentioned in this article