Dam Water Level: राज्यातील 12 जलप्रकल्प कोरडेठाक, 17 धरणांमध्ये 10 टक्क्यांहून कमी पाणीसाठा

Dam Water Level : वाढत्या उन्हामुळा जलाशयांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Dam Water Level : एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीला फक्त 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशेष म्हणजे राज्यभरातील 12 प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे. तर 17 प्रकल्पांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक कमी पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण प्रत्यक्षात पावसाळा सुरू होईपर्यंत राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईच्या झळा बसताना दिसत आहे. 

वाढत्या उन्हामुळा जलाशयांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे अनेक धरण कोरडी पडू लागली आहे. राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहुया.

(नक्की वाचा - Mumbai Metro : मुंबईकरांसाठी Good News! मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू)

विभागनिहाय धरणांमधील पाणीसाठा

नागपूर
धरणांची संख्या : 383
पाणीसाठा : 34.50 टक्के

अमरावती
धरणांची संख्या : 264
पाणीसाठा : 44.08 टक्के

छत्रपती संभाजीनगर
धरणांची संख्या : 920
पाणीसाठा : 29.90 टक्के

नाशिक
धरणांची संख्या : 537
पाणीसाठा : 32.46 टक्के

पुणे
धरणांची संख्या : 720
पाणीसाठा : 24.18 टक्के

कोकण
धरणांची संख्या : 173
पाणीसाठा : 39.28 टक्के

Topics mentioned in this article