
मुंबईतील वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मुंबई मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्या 10 मेपासून सुरू होत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्याच्या स्थानकादरम्यान प्रवास करून पाहणी केली. मुंबईच्या बीकेसी स्थानकापासून ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतचा टप्पा हा मार्ग असणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण सहा स्थानकांचा समावेश असणार आहे. या प्रवासासाठी 15 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागेल. यापूर्वी आरे ते बीकेसी स्थानकापर्यंतचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात 10 आणि आता दुसऱ्या टप्प्यातील सहा अशी मिळून एकूण 16 स्थानकावर मेट्रो तीनची सुविधा सुरू झाली आहे.
नक्की वाचा - मुंबईतील रस्त्यांची काम कधी पूर्ण होणार? BMC नं सांगितली डेडलाईन
मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये
- या मार्गावर धावणारी मेट्रो ही मुंबई शहरात सुरू होणारी पहिली मेट्रो मार्गिका असेल.
- मिठी नदीच्या 18 मीटर खालून ही मेट्रो मार्गिका गेली आहे.
- आरे जे व्ही एल आर ते आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतचा प्रवास फक्त चाळीस रुपयात होणार आहे.
- या मार्गीकीमुळे आर.एस. स्थानक ते वरळीपर्यंतचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात करता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world