MSRTC कडून महाराष्ट्राच्या जनतेसाठी नववर्षाचं खास गिफ्ट; नवी 'लालपरी' प्रवाशांच्या भेटीला

एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आगामी वर्षात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे 1300 नव्या लालपरी बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहे. एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 

नक्की वाचा - एसटीचं नवं उड्डाण! विमानाप्रमाणे बसमध्येही प्रवाशांचं स्वागत करणार 'सुंदरी'

सध्या एसटीकडे बसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता 14 हजार बस असून कोरोना महामारीपूर्वी म्हणजे 2018 मध्ये एसटीकडे तब्बल 18 हजार बस होत्या. परंतू गेल्या 3-4 वर्षात कोरोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बस खरेदी करणं शक्य झालं नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढलं आहे. परिणामी प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणं शक्य होत नाही. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या 2200 बस खरेदी करण्याचा व 1300 बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत बसगाड्यांच्या कमतरतेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 11 लाखांची घट झाली आहे. 

नक्की वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 26 प्रवासी जखमी

या सुमारे 1300 हून जास्त बस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसची दोन-दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्यातील सर्व बस स्थानकाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून काही बस स्थानके शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्त्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्याने राज्यभरातील 183 बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली आहे.