जाहिरात

एसटीचं नवं उड्डाण! विमानाप्रमाणे बसमध्येही प्रवाशांचं स्वागत करणार 'सुंदरी'

एसटीचं नवं उड्डाण! विमानाप्रमाणे बसमध्येही प्रवाशांचं स्वागत करणार 'सुंदरी'
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

विमान प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या आदरातिथ्यासाठी 'हवाई सुंदरी' ची नियुक्ती करण्यात येत असते. ही बरीच जुनी परपंपरा आहे. विमानप्रमाणेच आता लवकरच बसमध्ये प्रवाशांचं स्वागतही सुंदरी करणार आहेत.  एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये गोगावले यांनी ही घोषणा केली. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुठे होणार सुरुवात?

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. आनंदाची बाब म्हणजे  प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, असं गोगावले यांनी सांगितलं. 

आनंद आरोग्य केंद्र

एसटीच्या 343 बस स्थानकांवर "आनंद आरोग्य केंद्र" या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब आणि औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे. 

( नक्की वाचा : सणासुदीला शहरातील नागरिक दाबून खरेदी करणार, उलाढालीचा आकडा ऐकाल तर डोळे पांढरे होतील )
 

मूल आणि धारणीमध्ये नवे आगार 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार आहे.  या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होईल.

महिलांच्या बचत गटांना जागा 

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन१०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना  या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र
एसटीचं नवं उड्डाण! विमानाप्रमाणे बसमध्येही प्रवाशांचं स्वागत करणार 'सुंदरी'
ajit-pawar-replies-amit-shah-bjp-2029-government-announcment
Next Article
....फक्त भाजपाचे सरकार, अमित शाहांच्या घोषणेला अजित पवारांचं उत्तर