मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक व खाजगी बसचा अपघात होऊन 26 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे मुंबई लेनवरील खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना टायर पंक्चर झाल्यानंतर एक ट्रक बोगद्यामध्ये तिसऱ्या लेनवर उभा होता. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या बाळूमामा कंपनीच्या खासगी बसला तिसऱ्या लेनमध्ये उभा असलेला ट्रक लक्षात आला नाही. आणि ट्रकला जबर धडक बसली. या बसमध्ये एकूण 38 प्रवासी होते. त्यातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात गंभीर व किरकोळ झालेल्या सर्व प्रवाशांना लोकमान्य हॉस्पिटल स्वामिनी ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
या अपघातात बस व ट्रक दोन्ही वाहने आयआबीकडील हायड्राच्या व पुलरच्या साहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आलेले आहे. या अपघातात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा, हेल्प फाऊंडेशन सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बाहेर काढण्यात आलं आहे. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत कार्य केले.
नक्की वाचा - उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे मुंबई लेनवरील खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना नवीन बोगद्यामध्ये ट्रकचं (KA 56 5675) टायर पंक्चर असल्याने तिसऱ्या लेनमध्ये उभा होता. यावेळी पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस येत होती. (MH 03 DV 2412) यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
गंभीर जखमी
1) मनीषा भोसले
2) सुनिता तराळ
3) बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक)
4) संकेत सत्तपा घारे
( सह चालक)
5) अभिजित दिंडे
6) सरिता शिंदे
7) संदीप मोगे
8) सोनाक्षी कांबळे
किरकोळ जखमी
1) सना बडसरिया
2) शिवांश
3) तनिष्का
4) हर्ष
5) अद्विका
6) गरिमा पाठक
7) प्राची
8) श्रेया
9) समीक्षा
10)साक्षी रेपे
11)मानसी लाड
12)जोहा अन्सारी
13)अमित शहा
14)दीक्षा
15)चेतन भोपळे
16)माही
17)शौर्य
18)आदिल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world