विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली 15 वर्षीय मुलगी बुडाली, पुण्याच्या इंदापुरातील घटना

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, इंदापूर

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथील ही घटना आहे. विहिरीत पाय घसरुन पडल्याने बुडून या मुलीची मृत्यू झाला आहे.  सारिका पिराजी शिंदे असं या मुलीचं नाव आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

24 जून रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सारिका विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. मात्र ती घरी परतली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. त्यानंतर विहिरीच्या कडेला तिने आपल्या सोबत नेलेला काही वस्तू आढळून आल्या. त्यानंतर ही मुलगी विहिरीत पाय घसरून पडून बुडाली असावी, असा अंदाज लावला गेला आणि तेव्हापासून तिचा शोध घेतला जातोय. 

( नक्की वाचा- निवृत्त बँक मॅनेजरला गंडवलं, तब्बल साडेनऊ लाखांचा लावला चुना)

घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. संबंधित विहीर ही जास्त खोल असल्यामुळे आणि सध्या पावसाळा सुरू असल्याने या विहिरीत भरगच्च पाणी आहे. सध्या तीन विद्युत मोटारीच्या सहाय्याने हे पाणी उपसले जात असून प्रशासनाकडून वेगाने शोधकार्य सुरू आहे.

(नक्की वाचा- झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली)

स्थानिक नागरिक देखील प्रशासनाला या कार्यात मदत करत आहेत. नागरिकांच्या सहाय्याने मुलीचा शोध सुरू आहे. या घटनेने शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article