जाहिरात
Story ProgressBack

मटणाच्या जेवणावर मारला ताव, 19 जणांना विषबाधा

मसोबा तांडा इथे एक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी एकत्र आले होते. मटणाचे जेवण आटोपले. बरेचसे मटण शिल्लक राहीले होते.

Read Time: 1 min
मटणाच्या जेवणावर मारला ताव, 19 जणांना विषबाधा
यवतमाळ:

मटणाचे जेवण जेवल्यानंतर 19 जणांना विषबाधा झालीय. यवतमाळ जिल्ह्यातील मसोबा तांडा आणि अंजी इथं ही घटना घडली आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ज्यांना विषबाधा झाली त्यात 13 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मसोबा तांडा इथे एक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी एकत्र आले होते. मटणाचे जेवण आटोपले. बरेचसे मटण शिल्लक राहीले होते. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी जेवणात वाढण्यात आले. त्यामुळेच विषबाधा झाली. बुधवारी दुपारी 19 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा - Exclusive : 'त्या' निकालातील मोठी चूक पोलिसांनी पकडली, पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

शिळं मटण खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे ग्रामिण रूग्णालयाचे डॉक्टर सुनील भवरे यांनी सांगितले. ज्यांना विषबाधा झाली आहे ते निरीक्षणा खाली आहेत. सर्वांची प्रकृती ही स्थिर आहे. तर काहींना घरी सोडण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जूनपासून लागू होणार नवा नियम
मटणाच्या जेवणावर मारला ताव, 19 जणांना विषबाधा
Pune poshe case court sent minors father-to-police-custody-till-may-24
Next Article
Pune Posrshe Accident : 2 जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलीस कोठडी
;