जाहिरात

मैत्रिणींच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, नाशिकमधील घटनेने खळबळ

ललितने बाईक आणि आईचे दागिने विकून मैत्रिणीला पैसे दिले होते. मात्र जिज्ञासाने उरलेल्या पैशांच्या बदल्यात चारचाकी गाडीची मागणी केली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून ललितने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.   

मैत्रिणींच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, नाशिकमधील घटनेने खळबळ

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

दोन मुली आणि एका तरुणाच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे. नाशिकच्या सिडको कामटवाडे परिसरात ही घटना घडली आहे. आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचं तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

ललित बाळासाहेब कोयटे असं मृत तरुणाचं नाव आहे. ललितने सुसाईड नोटमध्ये मैत्रिण जिज्ञासा, मीना आणि ओंकार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  बळी मंदिराजवळ त्याचा कॅफेचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार, ललित यांने त्याची मैत्रिण जिज्ञासाकडून 1 लाख रुपये घेतले होते. 1 लाखांपैकी ललितने 40 हजार रुपये परत केले होते. तर 60 हजार रुपये देणे बाकी होते. ललित उरलेले पैसेही देणार होता. 

(नक्की वाचा-  गुंगीचं औषध देऊन शिक्षकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार, अकोल्यातील धक्कादायक घटना)

मात्र ललितची मैत्रिणीसह आणि दोघांनी त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. मैत्रिणीने घरी येऊनही गोंधळ घातला होता. तिघेही ललितच्या मित्रांना फोन करुन पैशांच्या व्यवहाराबाबत सांगत होते. तिच्या ओंकारेने देखील ब्लॅकमेल केल्याचं ललितने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 

ललितने बाईक आणि आईचे दागिने विकून मैत्रिणीला पैसे दिले होते. मात्र जिज्ञासाने उरलेल्या पैशांच्या बदल्यात चारचाकी गाडीची मागणी केली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून ललितने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.   

(नक्की वाचा-  जम्मू-काश्मीरमधील भाजप उमेदवाराचं निधन, 25 सप्टेंबरला झालं होतं मतदान)

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. ललितच्या दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
14 हजार रुपयांचा हफ्ता घेतला आणि 23 बेडशिटही ढापल्या; पुण्यातील 2 पोलीस निलंबित
मैत्रिणींच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, नाशिकमधील घटनेने खळबळ
gautam-adani-teachers-day-speech-mumbai-jai-hind-college
Next Article
Gautam Adani Success Story : 16 व्या वर्षी पहिल्यांदा सीमा ओलांडली, गौतम अदाणींनी सांगितलं यशाचं रहस्य