Pune News : सॉफ्टवेअर इंजिनियर, टाटामध्ये नोकरी; तरुणाच्या मृतदेहाने हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये खळबळ

पुण्यातील हिंजेवाडी आयटी पार्कमधील कंपनीत मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातील हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा मृतदेह कॅन्टीनमधील शौचालयात आढळला. हा तरुण टीसीएसमध्ये काम करीत होता. सुजल विनोद ओसवाल असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 

मोबाइल चार्जिंगच्या वायरने संपवलं जीवन...

२४ वर्षीय सुजल विनोद हा हिंजेवाडी फेज-३ येथील टिसीएस कंपनीत काम करीत होता. तो मूळचा पुण्याच्या वानवडी भागात राहणारा होता. तो सुशिक्षित होता. टाटांच्या कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रुजू झाला होता. त्याने मोबाइल चार्जिंग केबलच्या साहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल कंपनीच्या कँटीनजवळील शौचालयात गेला आणि येथेच त्याने मोबाइल चार्जिंग केबलच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत सूचना मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आर्थिक अस्थिरता आणि मानसिक दबाव कारण असल्याचं सांगितलं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यात ट्रेकिंगसाठी गेलेल्या 50 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; स्थानिकांमुळे मोठा अनर्थ टळला!

आत्महत्येचं धक्कादायक कारण...

सुजलने आत्महत्येपूर्वी त्याच्या जवळच्या नातेवाईकांना मेसेज पाठवला होता. यामध्ये त्याने ऑनलाइन सट्टा-बेटिंगमुळे आर्थिक नुकसान झाल्याचा उल्लेख होता. या आर्थिक अडचणीतून तो मानसित तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. 


 

Topics mentioned in this article