जाहिरात

Shocking Accident : तनुषा,साई प्रिया आणि नंदिनी..भीषण अपघातात 3 सख्ख्या बहि‍णींचा झाला मृत्यू!

Telangana Accident Latest Update : हैदराबाद-बिजापूर हायवेवर बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 19 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातामुळे अनेक कुटुंबीयांचा संसार-प्रपंच उद्ध्वस्त झाला आहे.

Shocking Accident : तनुषा,साई प्रिया आणि नंदिनी..भीषण अपघातात 3 सख्ख्या बहि‍णींचा झाला मृत्यू!
Telangana Bus Accident News
मुंबई:

Telangana Accident Latest Update : हैदराबाद-बिजापूर हायवेवर बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 19 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातामुळे अनेक कुटुंबीयांचा संसार-प्रपंच उद्ध्वस्त झाला आहे.ज्यांनी कुटुंबासाठी सोनेरी स्वप्न पाहिले होते, त्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. अशाचप्रकारीच काळजाचा ठोका चुकवारी घटना गौड नावाच्या ड्रायव्हरसोबतही घडली. या ड्रायव्हरने भयानक अपघातात त्याच्या तिन्ही मुलींना गमावलं.तनुषा,साई प्रिया आणि नंदिनी अशी मृत महिलांची नावे आहेत.

अपघातात तिन्ही बहि‍णींचा झाला मृत्यू

या घटनेत मृत पावलेल्या तिन्ही बहिणी हैदराबादमध्ये शिक्षण घेत होत्या. एक मुलगी लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तांडूर येथे आली होती. कुटुंबाने नुकतंच मोठ्या मुलीचा अनुषाच्या लग्नाचा आनंदोत्सव साजरा केला होता. आता आणखी एक लग्नासाठी मुली घरी आल्या होत्या. यलैयाने सांगितलं की, मी त्यांना इकडे येण्यासाठी नकार दिला होता.पण त्यांच्या आईने त्यांना इथे बोलावलं होतं.त्यानंतर त्यांना रात्री परत जायचं होतं. आम्ही म्हणालो सोमवारी सकाळी जा.जेव्हा आम्ही त्यांना बस स्टॉपला सोडलं,कोणीतरी सांगितलं की बस बिघडलेली आहे. तरीही त्यांना पाठवलं. आता तीन मुली गेल्या, मी काय करू? असं म्हणत यलैयाने दु:ख व्यक्त केलं.

नक्की वाचा >>  World Champions देशभरात जल्लोष! कधी होणार टीम इंडियाची 'Victory' परेड? BCCI ने दिली सर्वात मोठी अपडेट

आई आणि मुलींची शेवटची भेट

या अपघातात 33 वर्षीय सलीहा बेगम आणि त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. तो हैदराबादमध्ये त्याच्या काका-काकीला भेटण्यासाठी प्रवासाला निघाला होता. पण अपघातात त्याचाही दुर्देवी मृत्यू झाला आणि सलीहाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला. एक आईची शेवटची भेट, जी तिच्या मुलाला वाचवू शकली नाही. हनुमंथू ज्याने हैदराबादला जाणारी ट्रेन मिस केली होती. त्यानंतर त्याने बसने जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याचाही हा शेवटचा प्रवास ठरला. त्याचा दहा वर्षांचा मुलगा विवेकलाही रडू कोसळलं.

नक्की वाचा >> OLA बाईकचं पेट्रोल संपलं! महिला ड्रायव्हरसोबत पंपापर्यंत 1KM चालली, रात्री घरी पोहोचताच आईसमोर रडली अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com