
Western Railway : पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना 26 ते 28 एप्रिल दरम्यान मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान 35 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा ब्लॉक 26 एप्रिल (शनिवार) दुपारी 1 वाजल्यापासून 28 एप्रिल (सोमवार) च्या मध्यरात्रीपर्यंत एकूण 35 तास सुरू राहील. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान पुल क्रमांक 61 वर पुन्हा गर्डरिंगच्या कामामुळे मोठा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. ज्यामुळे अनेक लोकल आणि मेल/एक्स्प्रेस ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे.
(नक्की वाचा - आम्ही टिकल्या काढल्या अन् 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो, गणबोटेंच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव)
मेगाब्लॉकदरम्यान पाचव्या रेल्वे लाईनवरील गर्डर्स, कांदिवली कारशेड लाईन आणि ट्रॅकच्या पूर्वेकडील यार्ड लाईन बदलणे या कामांचा समावेश असेल. या कामांमुळे भविष्यात अधिक गाड्या सामावून घेण्यासाठी, रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यास मदत होईल.
(नक्की वाचा- Yes Bank Scam : येस बँक लोन घोटाळा प्रकरणी संस्थापक राणा कपूर यांना जामीन मंजूर)
पश्चिम रेल्वेवरील या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे सेवांवर परिणाम होईल. 26 एप्रिल रोजी 73 आणि 27 एप्रिल रोजी 90 रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकचा पाचव्या मार्गावर परिणाम होईल, मात्र परंतु मुख्य स्लो आणि फास्ट मार्ग कार्यरत राहतील. ज्यामुळे रेल्वेगाड्या रद्द होण्याचे एकूण प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. ब्लॉकदरम्यान पाचव्या मार्गावर धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world