Sangamner leopard Attack Viral Video : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी दहशत माजवली आहे. पुणे, नाशिक, मुंबई, रायगडसह काही भागात बिबट्यांचा मुक्त संचार बोत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातही बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथेही भयंकर घटना घडली. घरासमोर खेळत असलेल्या सिद्धेश कडलग या चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने भीषण हल्ला केला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. परंतु,उपचारापूर्वीच सिद्धेशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बिबट्याने चिमुकल्याला शेतात ओढून नेलं आणि नंतर...
मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धेश सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होता. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर बिबट्याने चिमुकल्याला गिन्नी गवताच्या शेतात ओढून नेले. या घटनेची माहिती मिळताच घरातील महिलांनी आरडाओरडा सुरु केला.त्यानंतर बिबट्याने मुलाला सोडून दिलं अन् तो सुसाट पळाला.
नक्की वाचा >> Pune News : मावळ हादरलं! घरातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या
इथे पाहा बिबट्याचा थरारक व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) December 14, 2025
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धेशला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याच्या सिद्धेशच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. अंभोरे येथे अनिल कोटकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशी भयंकर घटना घडली. त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!
रायगडच्या अलिबागमध्येही बिबट्याचा वावर
काही दिवसांपूर्वी पनवेलमध्येही बिबट्या घुसल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर 9 डिसेंबरला रायगडच्या अलिबागच्या मुरुड मार्गांवर असलेल्या नागावर पर्यटनस्थळावर बिबट्याने शिरकाव केला होता. या बिबट्याने 5 नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यानंतर वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बिबट्याच्या दहशतीमुळे अलिबाग नागावच्या शाळांनी सुट्टीही जाहीर करण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world