शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli Crime News: सांगलीच्या जत तालुक्यातल्या भिवर्गी येथे एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दारूच्या नशेत मस्करीत दोघा भावांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. त्यानंतर नशेत टल्ली असणाऱ्या एका चुलत भावने दुसऱ्या चुलत भावाचा गळा दाबला. या हाणामारीत महादेव बिरादार (26) याचा मृत्यू झाला.या घटनेचा व्हिडीओ काही लोकांनी कॅमेरात कैद केला.भिवर्गी येथील गौडर वस्ती येथे हा प्रकार घडला आहे.घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली असून भावाच्या खून प्रकरणी चुलत भाऊ सालसिद्ध बिरादार विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित सिलिसिद्ध मल्लाप्पा बिरादार (रा.भिवर्गी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दोघेही एकाच भावकीतील असल्याचे सांगण्यात येते.पोलिसांना घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की,महादेव बिरादार हा शेती व्यवसाय करत होता.त्याची पत्नी नुकतीच बाळंतपणासाठी माहेरी सोलापूर जिल्ह्यातील कुसूर येथे गेली आहे. महादेव हा कुटुंबातील मोठा मुलगा आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण हादरलं! भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, भयानक कारण आलं समोर
तो गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध अवस्थेत खाली पडला
दोघांमध्ये मस्करीमुळे किरकोळ वाद झाला आणि त्याच कारणावरून हत्येची घटना घडली, अशी माहिती आहे. आरोपीने महादेवच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली.यात तो गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध अवस्थेत खाली पडला.त्यावेळी हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आला.त्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी महादेवला चारचाकी वाहनातून जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र,तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नक्की वाचा >> Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताय? 'या' कारमुळे सर्वच प्रवाशांच्या जीवाला धोका, थरारक Video
या घटनेनंतर संशयित सिलिसिद्ध पसार झाला होता.मात्र,पोलिसांनी तत्काळ हालचाल करत त्याला गावातूनच ताब्यात घेतले आहे.भिवर्गी येथील घटना मारहाणीतून झाली आहे की आणखी कोणत्या कारणातून,याचा तपास सुरू आहे.दोघांनीही मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे.त्यामुळे महादेवचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे.याबाबत उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world