मनिष रक्षमवार, प्रतिनिधी
Gadchiroli Viral News Today : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेनं कहर केला आहे. बहुतांश ठिकाणी सूर्य आग ओकत असल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णतेचं तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे जात असल्याचं चित्र आहे. उष्माघाताचा फटका नागरिकांनाही बसला असतानाच आता विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिरोंच्या तालुक्यातील वटवाघळांच्या वसाहतीत 500 हून अधिक वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
हा परिसर वटवाघळांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो
मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंच्यातील काही परिसरात चिंचेची मोठी झाडे आहेत आणि त्या चिंचेच्या झाडांवर गेल्या अनेक वर्षांपासून चार ते पाच हजार वटवाघळांचे वास्तव्य आहे.त्यामुळे हा परिसर वटवाघळांचे माहेरघर म्हणून देखील ओळखला जातो. वटवाघळे ही झाडांना उलटे लटकलेल्या अवस्थेतच राहतात.पण याठिकाणी मात्र ती मृतावस्थेत आढळली.या घटनेमुळं प्राणी प्रेमींची चिंता वाढली आहे.
नक्की वाचा >> Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला
नवतपा सुरू झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा फटका माणसांना जाणवत असतानाच तो वन्यजीवांना देखील तेवढाच जाणवत आहे. उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे सिरोंचा तालुक्यातील वटवाघळांच्या वसाहतींमधून वेदनादायी चित्र समोर आले आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे या वसाहतीतील 500 हून अधिक वटवाघळांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सिरोंचात तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर ही परिस्थिती गंभीर झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे .आता नवतपा सुरू झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
नक्की वाचा >> Shirdi News: आताच अलर्ट व्हा! साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांची होतेय लूट, शिर्डीत काय-काय घडतंय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world