जाहिरात

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला
Chhatrapati Sambhaji Nagar Shivsena Latest News

मोसिन शेख, प्रतिनिधी 

Chhatrapati Sambhajinagar Crime News :  छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबा पेट्रोलपंप चौक परिसरात गळाभेटीच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला,अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रविवारी रात्री उशिरा नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री उशिरा आरोपी राम बोडखेने अंबादास म्हस्के यांना फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर बाबा पेट्रोलपंप चौकात भेट झाल्यानंतर “मजाक करत होतो” असे म्हणत आरोपीने गळाभेट घेत अचानक चाकूने गळ्यावर वार केला,असं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Devendra Fadnavis : पुण्यात होणार 400 कोटींची गुंतवणूक, CM फडणवीसांनी सांगितला सरकारचा मोठा प्लॅन

आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार

गंभीर जखमी अवस्थेत म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'बोंबाबोंब' आंदोलन, 'या' भागातील 36 गावांवर मोठं संकट, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com