IAS Officers Transfer : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी

IAS Officer Transfer : तुकाराम मुंडे, रणजीत कुमार, नीमा अरोरा, व्ही राधा, अमन मित्तल, अमगोथू श्रीरंगा नायक, रोहन घुगे या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. बदली झालेल्या IAS अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंडे यांचा देखील समावेश आहेत. तुकाराम मुंडे यांची ही 22 वी बदली आहे. 

तुकाराम मुंडे, रणजीत कुमार, नीमा अरोरा, व्ही राधा, अमन मित्तल, अमगोथू श्रीरंगा नायक, रोहन घुगे या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. 

(नक्की वाचा -  मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर, घेणार मोठा निर्णय?)

IAS अधिकारी बदल्यांची यादी 

  • तुकाराम मुंडे- विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
  • रणजीत कुमार - अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे
  • नीमा अरोरा - सह आयुक्त वस्तू व सेवा कर, मुंबई
  • व्ही राधा - प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
  • अमन मित्तल - सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन-मित्र, मुंबई
  • अमगोथू श्रीरंगा नायक - आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
  • रोहन घुगे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (ठाणे)

(नक्की वाचा - अधिवेशना पूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार? 'ही' नावे चर्चेत)


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world