जाहिरात

Snake Bite : सापाच्या दंशाने झाला असता 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मात्र आईच्या एका निर्णयाने वाचला जीव

साप चावल्यानंतर बऱ्याचदा लोक चुकीचं पाऊल उचलतात त्यामुळे नागरिक जीव गमावतात.

Snake Bite : सापाच्या दंशाने झाला असता 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मात्र आईच्या एका निर्णयाने वाचला जीव

Snake Bite : आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ती आपल्या मुलासाठी झटते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका ९ वर्षांच्या मुलाला सापाने दंश केला होता. मात्र आईच्या एका निर्णयामुळे मुलाचा जीव वाचला आहे. 

सापाने पायाला दंश केल्यानंतर कुटुंबाने दाखवलं प्रसंगावधान...

मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षांचा यश घराबाहेर खेळत होता. तेव्हा अचानक लाकडांमधून एक साप आला आणि त्याच्या पायाला दंश केला. मुलगा आरडाओरडा करू लागला. यशची आई राजकुमारी आणि कुटुंबातील लोक तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी वेळ घालवता समजूतदारपणा दाखवला. कुटुंबीयांनी त्या सापाला पकडलं आणि त्याला एका पिशवीत भरलं. यानंतर सर्वजण थेट जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डात पोहोचले. 

रुग्णालयात गेल्यानंतर आईने डॉक्टरांना पिशवीतून आणलेला साप दाखवला. ज्यामुळे डॉक्टरांना नेमकं विषाची ओळख पटली. आपत्कालिन वॉर्डातील डॉक्टरांनी वेळ न दवडता सापाला पाहिलं आणि त्याच्या आधारावर यशवर तातडीने उपचार सुरू केले. सुरुवातील रक्त नमुन्याची प्रक्रिया सुरू केली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि कुटुंबीयांच्या समजूतदारपणामुळे, यश आता पूर्णपणे धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा - Navi Mumbai Video : तुफान पाऊस, एक चुकीचं पाऊल अन् कॉलेजमधील 2 तरुणींना आयसीयूत केलं दाखल; नेमकं काय घडलं?


उत्तर प्रदेशातील महोबा तालुक्यातून ही घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लोकांना अत्यंत महत्त्वाचं अपील केलं आहे. पावसाळ्यात ओलावा वाढल्यामुळे साप अनेकदा बाहेर निघतात, यासाठी मुलांना अंधारात जाऊ देऊ नका आणि शेतात जाताना शूज घाला आणि अलर्ट राहणं आवश्यक आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com