जाहिरात
Story ProgressBack

एका मित्राची मस्ती दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतली

मस्ती मस्तीत एका अल्पवयीन तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे त्या तरूणाला आपल्या मित्राच्या एका चुकीमुळे जीव गमवाला लागला आहे.

Read Time: 2 mins
एका मित्राची मस्ती दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतली
नवी मुंबई:

नवी मुंबईत एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. मस्ती मस्तीत एका अल्पवयीन तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे त्या तरूणाला आपल्या मित्राच्या एका चुकीमुळे जीव गमवाला लागला आहे. नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी परिसरात ही दुर्घटना घडली. या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोन क्वारीच्या पाण्यात पाच मित्र पोहायला गेले होते. हे पाचही जण  अल्पवयीन होते. मात्र पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला. त्यात तो वर येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला वर येताच आले नाहीत. त्यामुळे ही मस्ती थोडा वेळ सुरूच होती. शेवटी त्या अल्पवयीन तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला होता. त्या तरूणाचे वय अवघे 17 वर्षे होते. 

ट्रेंडिंग बातमी - नाशिकमध्ये अघोरी कृत्य करणाऱ्या एकाला अटक, प्लास्टिकच्या मानवी कवट्याही आढळल्या

याबाबतची माहिती तुर्भे पोलिसांना समजली. त्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर त्या चार मित्रांना ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशीही करण्यात आली. त्या पैकी दोघांनी झालेला प्रकार सांगितला. शिवाय आपण केलेल्या कृत्याची कबुलीही दिली. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जण हे अल्ववयीन असल्याने त्यांना भिवंडी इथल्या बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
नाशिकमध्ये अघोरी कृत्य करणाऱ्या एकाला अटक, प्लास्टिकच्या मानवी कवट्याही आढळल्या
एका मित्राची मस्ती दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतली
Election Commission officer clarification on mumbai north west evm issue
Next Article
'ईव्हीएमला मोबाईल जोडता येत नाही'; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण
;