जाहिरात

Navi Mumbai : 'पोलीस ठाण्यात गेलास तर खल्लास'; भररस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, स्थानिकांमध्ये घबराट

काही तरुणांनी संबंधित तरुणाला रस्त्याच्या कडेला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Navi Mumbai : 'पोलीस ठाण्यात गेलास तर खल्लास'; भररस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, स्थानिकांमध्ये घबराट

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai : खारघर परिसरात एका तरुणाला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. मारहाण करताना “पोलीस ठाण्यात गेलास तर तुझा मर्डर करू” अशी उघड धमकी दत्तू नावाच्या तरुणाकडून दिले जात असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ही घटना खारघरमधील एका सेक्टरमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. काही तरुणांनी संबंधित तरुणाला रस्त्याच्या कडेला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे. आजूबाजूला उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. मात्र, कोणीही तत्काळ हस्तक्षेप न केल्याचेही दिसून येते.

नक्की वाचा - प्रेयसीची हत्या, मृतदेहावर रेप, पश्चाताप झाला म्हणून तंत्र-मंत्र; मुंबईतून अटक केलेल्या पियूषचं भयंकर कृत्य

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात नवी मुंबई पोलीस यांच्या खारघर पोलीस ठाणे येथे संपर्क साधला असता संबंधित व्हिडीओची चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले. मिळालेल्या माहिती नुसार मारहाणीत जखमी झालेला तरुण परप्रांतीय असून सेक्टर 19 मध्ये भाड्याने राहत असल्याचे समजते. या घटनेमुळे खारघर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com