प्रांजल कुलकर्णी, नाशिक
Nashik Crime News : नाशिकमध्ये आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आहे. सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीने पोलिसांना चकवा देत पोबारा केला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याबाहेरील मंगळावीर संध्याकाळची घटना आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
क्रिश शिंदे असे आरोपीचे नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतताना शासकीय वाहनातून उतरून तो फरार झाला. त्याच्या एका साथीदाराने यात त्याला मदत केल्याचे दिसून येत आहे.
(नक्की वाचा- Pahalgam Terror Attack: 'ती' दुर्घटना घडली अन् पहलगाम हल्ल्यातून 18 जण वाचले, नाशिककरांनी सांगितला थरारक अनुभव!)
व्हिडीओत दिसत आहे की, आरोपी क्रिश पोलिसांच्या ताब्यातून पळ काढत आहे. ठाण्याबाहेर आधीच एक दुचाकी त्याच्यासाठी उभी होती. क्रिश धावत आला आणि त्या दुचाकीवर उडी मारून बसला. काही क्षणात दुचाकी वेगाने पुढे निघून गेला. आरोपीचा पाठलाग करताना एक पोलीस खाली पडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.