रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune Shocking News Today : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सुधीर बराटे असं या उद्योगपतीचं नाव असून त्यांनी आरोपी भुपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघवच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल केलीय. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी भुपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघवला पश्चिम बंगालमध्ये बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुधीर बराटे नावाच्या व्यावसायीकाला 3 कोटी रुपयांचा गंडा घातल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी भुपेंद्र सिंहने बराटे यांना व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल दुबईहून देतो, असं सांगितलं होतं. त्यानंतर आरोपी भुपेंद्रने बराटे यांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बराटे यांनी पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पुणे पोलिसांना सांगितला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन आरोपी भुपेंद्र सिंहला बेड्या ठोकल्या.
नक्की वाचा >> 'कमला पसंद', 'राजश्री पान मसाला' मालकाच्या सूनेनं जीवन का संपवलं? 12 वाजता पोलिसांना कॉल अन्..
बाप-लेकाने उद्योगपती बराटे यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर..
सुधीर बराटे यांचा पुण्यातील रविवार पेठेत तांब्याची भांडे बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल ते मुंबई येथून ऑर्डर करतात. त्याचदरम्यान त्यांची ओळख आरोपी भुपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघव आणि त्याचा मुलगा प्रनवीरसिंग संजय कुमार राघव याच्याशी झाली. या बाप-लेकाने बराटे यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना वचन दिलं की, व्यावसायासाठी लागणारा माल ते दुबईहून आणून देतील.
नक्की वाचा >> Pune News:पुण्यात सर्वात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांच्या रिसॉर्टवर बुलडोझर, शहराजवळील 300 बांधकामेही..
आरोपीने 75 टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवला अन्..
त्याचं दुबईत ऑफिस आहे, असंही त्यांनी बराटे यांना सांगितलं होतं. त्यानंतर बराटे यांना दुबईत बोलावण्यात आलं. त्यानंतर त्यांना टांझानियामध्ये नेण्यात आलं.त्यावेळी आरोपीने 75 टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवत तो भारतात निर्यात करायचा आहे,असं सांगत बराटे यांच्याकडून तब्बल 3 कोटी 79 लाख 77 हजार 375 रुपये उकळले.