Kamala Pasand Owner Daughter In Law Suicide Case : कमला पसंद आणि राजश्री पान मसालाचे मालक कमल किशोर यांची सून दीप्ती चौरसिया (40) ने मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पोलिसांनी एक सुसाईड नोट मिळालं आहे, त्यामध्ये कोणावरही आरोप लावण्यात आला नाहीय. दीप्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रारीत केला आहे. 2010 मध्ये कमल किशोर यांचा मुलगा हरप्रीत चौरसियासोबत दीप्तीचं लग्न झालं होतं. दोघांनाही 14 वर्षांचा एक मुलगा आहे. हरप्रीतने दोन लग्न केले आहेत, अशी माहिती आहे. दुसरी पत्नी दाक्षिणात्य फिल्म अभिनेत्री आहे.याप्रकरणी वसंत विहार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आत्महत्येमागे घरगुती कलह कारण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना एक आत्महत्येची चिठ्ठी मिळाली आहे. मात्र त्या चिठ्ठीत कोणालाही जबाबदार धरलेले नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की कौटुंबिक कारणांमुळे त्या अनेक दिवसांपासून तणावात होत्या.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, दीप्तीचा मृतदेह दुपट्ट्याला लटकलेल्या स्थितीत आढळला.घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे,पण त्यामध्ये कोणाचे नाव आहे आणि काय लिहिले आहे याबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती समोर आणली नाहीय.कमला पसंदचा व्यवसाय कानपूर, दिल्लीपासून कोलकाता आणि मुंबईपर्यंत पसरलेला आहे. प्रसिद्ध पान मसाला कंपनी कमला पसंदचे मालक कानपूरचे आहेत. कानपूरच्या फीलखाना मोहल्ल्यातून कमलाकांत चौरसिया यांनी गुटखा व्यवसाय सुरू केला होता. सुमारे 40-45 वर्षांपूर्वी ते गुमटीत उघड्या पान मसाल्याची विक्री करत होते, पण आज त्यांच्या कंपनीचा अब्जावधी रुपयांचा टर्नओव्हर आहे. त्यांच्या पान मसाला आणि गुटख्याचे अनेक ब्रँड आहेत.
नक्की वाचा >> Viral Video: खऱ्या प्रेमाची अनोखी कहाणी! लग्नाआधीच होणाऱ्या पत्नीचा अपघात, पतीने रुग्णालयातच बांधलं मंगळसूत्र
1980-85 दरम्यान घरातच पान मसाला बनवायला सुरुवात केली
कमलाकांत चौरसिया यांनी 1980-85 दरम्यान घरातच पान मसाला बनवायला सुरुवात केली होती. काहू कोठीतील एका गुमटीत ते पान मसाला विकत होते. नंतर त्यांना कुटुंबाकडूनही मदत मिळाली.कमला पसंद पान मसाल्याचे मालकी हक्क केपी समूह आणि कमलाकांत कंपनीकडे आहेत. कमलाकांत चौरसिया आणि कमल किशोर या कंपनीचे संस्थापक आहेत. कमला पसंद माउथ फ्रेशनरचे उत्पादनही करते,पण मुख्य पान मसाला ब्रँड केपी समूहाशी संबंधित आहे, असंही समजते. केपी ग्रुप ही कमला पसंद पान मसाला तयार करणारी मूळ कंपनी आहे. कमलाकांत कंपनी एलएलपीकडे या ब्रँडचा ट्रेडमार्क आहे.
नक्की वाचा >> "सर्वात मोठा धोका..",महिलेनं धावत्या ट्रेनमध्ये शिजवली मॅगी! Video व्हायरल होताच मध्य रेल्वेने उचललं कठोर पाऊल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world