जाहिरात

'...फिर पुराना खेल' म्हणणाऱ्या आरोपीच्या भावाचा खेळ खल्लास! अखेर पोलिसांकडून कारवाई

'आज जेल, कल बेल, फिर वही खेल' म्हणून धमकी देणाऱ्या आरोपीच्या चुलत भावाला अखेर अटक करण्यात आली आहे.

'...फिर पुराना खेल' म्हणणाऱ्या आरोपीच्या भावाचा खेळ खल्लास! अखेर पोलिसांकडून कारवाई
छत्रपती संभाजीनगर:

गावातील तरुण सतत त्रास देत असल्याने एका सोळा वर्षीय तरुणीने आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलल्याची घटना संभाजीनगरच्या ओव्हर गावात समोर आली होती. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेच्या घरासमोर जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. याबाबत NDTV ने वृत्त दाखवताच आता पोलीस खडबडून जागे झाले आहेत. 'आज जेल, कल बेल, फिर वही खेल' म्हणून धमकी देणाऱ्या आरोपीच्या चुलत भावाला अटक करण्यात आली आहे. तसेच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची खात्री आहे करत असल्याचे पोलीस म्हणाले आहेत.

नक्की वाचा - Exclusive: अश्लील Video पाहिले, रेड लाईट एरियात गेला...कोलकात्याच्या आरोपीचा हैराण करणारा रिपोर्ट

बदलापुरच्या प्रकरणातून व्यवस्थेविषयीचा आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. वारंवार होणारे गुन्हे पाहता आरोपींच्या मनात कायद्याविषयीची भीती आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये याच वृत्तीतून एका मुलीला जीव द्याला लागला. इथवर आरोपी थांबला नाही तर मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे आलेल्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपीच्या कुटुंबातील सदस्य 'आज जेल, कल बेल, फिर वही खेल' असं म्हणत धमकावत आहे. अखेर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली असून व्हिडिओत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 

काय आहे प्रकरण?
तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संभाजीनगरच्या ओव्हर गावात घडली. 'तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन,' अशी धमकी पूजाला दिली जात होती. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून पीडितेने टोकाच पाऊल उचललं असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. जो तरुण पीडितेला त्रास देत होता, त्याचं नाव कासीम पठाण असं आहे. कासीमसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आरोपीला अटक केल्यानंतर देखील त्याच्या कुटुंबीयांकडून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' असं म्हणत चाकू, तलवार दाखवून आरोपीच्या भावाकडून धमकी दिल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Cidco House : रेल्वे स्टेशनशेजारी घर खरेदी करता येणार, सिडकोच्या 40 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त दसऱ्याला!
'...फिर पुराना खेल' म्हणणाऱ्या आरोपीच्या भावाचा खेळ खल्लास! अखेर पोलिसांकडून कारवाई
Uddhav Thackeray's announcement to withdraw mahavikas aghadi Maharashtra bandh badlapur case
Next Article
'महाराष्ट्र बंद मागे पण...', उद्धव ठाकरे काय म्हणाले?