Ladki Bahin Yojna : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकारी/कर्मचारीऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या पत्रानुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक यादी समोर आली आहे.
या यादीत एकूण 1183 नावे आहे. हे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी योजनेच्या अपात्रतेच्या अटींनुसार पात्र नसतानाही जाणीवपूर्वक लाभ घेतला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Cotton Farmer: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ)
या गंभीर बाबीची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने संबंधित जिल्हा परिषदांना पत्राद्वारे कळवले आहे की, या गैरकृत्यामुळे शासनाची दिशाभूल झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी.
(नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?)
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी
पत्रात स्पष्ट केले आहे की, जिल्हा परिषदा ह्या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आवश्यक ती कारवाई करून त्याचा अहवाल महिला व बाल विकास विभागाला सादर करावा. आणि त्याची प्रत ग्रामविकास विभागाला देखील उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा गैरवापर करणाऱ्यांवर या कारवाईमुळे एक कठोर संदेश देण्यात आला आहे.