Ulhasnagar News : उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर कारवाई, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुन्हे दाखल

उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, उल्हासनगर

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. या डॉक्टरांचे दवाखाने सील करण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली. यामध्ये 18 डॉक्टर दवाखाने चालवत असल्याचं आढळून आलं, तर 4 डॉक्टरांचे दवाखाने आढळून आले नाहीत. 

(नक्की वाचा - Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम)

3 डॉक्टरांची मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी असून 1 डॉक्टर केडीएमसी हद्दीतला आहे. या प्रॅक्टिस करताना आढळलेल्या 18 डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत त्यांचे दवाखाने सील करण्यात आले. 

(नक्की वाचा-  बदलापुरातील मोठ्या घराच्या प्रेमात पडला अन् दिले दीड कोटी, ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे!)

Advertisement

पण महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच हे डॉक्टर पुन्हा दवाखाने सुरू करत असल्याचं आढळलं असून पोलिसांकडून त्यांच्यावर वचक ठेवणं गरजेचं आहे, परंतु पोलीस याबाबतीत योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी केला आहे.

Topics mentioned in this article