Satara News : कास पठारानजीक महसूल विभागाची मोठी कारवाई; पाचगणीच्या धनदांडग्यांना 4 लाखांचा दंड

साताऱ्यातील कास पठारानजीक छोटी-मोठी रिसॉर्ट तयार करणाऱ्या पुण्या-मुंबईच्या धनदांडग्यांना मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

सुजित आंबेकर, प्रतिनिधी

साताऱ्यातील कास पठारानजीक छोटी-मोठी रिसॉर्ट तयार करणाऱ्या पुण्या-मुंबईच्या धनदांडग्यांना मोठा धक्का बसला आहे. पठारानजीक पारंबेवाडी येथे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी अशोक किशनचंद भावनानी या पाचगणीच्या धनदांडग्याला तब्बल चार लाखांचा दंड ठोठावत सातारा तहसीलदारांनी मोठा दणका दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महसूल विभागाच्या या कारवाईनंतर कास पठार परिसरासह सातारा शहरात खळबळ उडाली आहे. भावनानी नामक हिंदी भाषिक पाचगणीचा एक धनदांडगा कास पठार परिसरात पाय रोवत आहे. बांधकाम करण्याच्या नावाखाली त्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याची माहिती सातारा तहसीलदारांना मिळाली होती. याआधारे ग्राम महसूल अधिकारी, मंडलाधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता त्याजागी विनापरवाना उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तहसीलदारांनी ठोस पावले उचलत 74 ब्रास मुरूम काढल्याप्रकरणी तीन लाख 85 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान यावेळी वापरण्यात आलेली वाहनसामग्री जेसीबी व ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात यावेत अशी मागणी होत आहे. सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केलेल्या कारवाईचे कासप्रेमींतून स्वागत होत आहे.

Advertisement

नक्की वाचा - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?

कास परिसरात पुण्या-मुंबईची बिल्डर लॉबी शिरकाव करत असून अनेक ठिकाणी विनापरवाना उत्खनन करून डोंगर पोखरला जात असल्याची ओरड असते. त्यामुळे महसूल विभागाने यापुढेही असेच सतर्क राहून जागतिक वारसास्थळाचे लचके तोडणाऱ्या धनदांडग्यांना असाच धडा शिकवावा असे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - पवना धरण परिसरात पुण्यातून फिरायला आलेले दोन पर्यटक बुडाले

कास पठार हे जागतिक वारसास्थळ आहे. इथला परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. कोणत्याही जागेमध्ये विकसनाचे काम करीत असताना शासन नियमातील अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे. विनापरवाना व बेकायदेशीर कोणीही उत्खनन अथवा गौण खनिजाची वाहतूक करू नये. कासचे निसर्गसौंदर्य जपण्यास सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलताना केले.

Advertisement