जाहिरात
This Article is From Dec 05, 2024

पवना धरण परिसरात पुण्यातून फिरायला आलेले दोन पर्यटक बुडाले

त्यावेळी त्यांचे मित्र किनाऱ्यावर होते. तर काही पाण्यात पोहोत होते. त्यांनी आपले मित्र पाण्यात बुडत आहेत हे त्यांना डोळ्या समोर दिसत होतं.

पवना धरण परिसरात पुण्यातून फिरायला आलेले दोन पर्यटक बुडाले
पुणे:

पवना धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. बुधवार दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे हे दोघे काही मित्रांच्या सोबतीने पवनाधरण परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. पवनाधरण परिसरात या आधीही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर हळहळ  व्यक्त केली जात आहे.   

मयूर भारसाके आणि तुषार अहिरे हे आपल्या मित्रांसह पनवाधरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. हे सर्व जण पुण्यातून निवांत क्षण घालवण्याच्या उद्देशाने आले होते. त्यावेळी काही जण धरणात पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी मयुर आणि तुषार हे पण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पण त्यांना त्यावेळी खोल पाण्याचा अंदाज आला नाही. ते पाण्यात बुडू लागेल. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. 

त्यावेळी त्यांचे मित्र किनाऱ्यावर होते. तर काही पाण्यात पोहोत होते. त्यांनी आपले मित्र पाण्यात बुडत आहेत हे त्यांना डोळ्या समोर दिसत होतं. त्यावेळी काहींनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यांना वाचवा वाचवा असा टाहो त्यांनी फोडला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी धावले. लोणावळा ग्रामीम पोलिसांनाही बोलावण्यात आलं. शिवदुर्ग  रेस्क्यू टीम ही दाखल झाली. 

त्या दोघांची शोधाशोध सुरू जाली. रात्री उशीरा पर्यंत हे शोधकार्य सुरू होते. त्यातल्या मयुर भारसके याचा मृतदेह शोध पथकाला सापडला आहे. रात्री उशीरा त्याचा मृतदेह सापडला. मात्र दुसरा मित्र तुषार अहिरे याचा शोध अजूनही लागला नाही. सकाळी त्याचे ही शोध कार्य सुरू करण्यात आले. हे दोन पर्यटक पुण्याच्या बालेवाडी येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होते. याच कंपनीतील आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com