"ये डर अच्छा है", आदित्य ठाकरेंनी मनेसच्या वरळीतील पोस्टरची उडवली खिल्ली

मनसेच्या या आव्हानाला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी 'ये डर अच्छा है म्हणत' जशास तसं उत्तर दिलं आहे. मनसेवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला सुपारीबाज पक्ष म्हटलं आहे. 

Advertisement
Read Time: 1 min

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात केलेली पोस्टरबाजी चांगली चर्चेत आली आहे. वरळीत मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात उतरतील असे सूतोवाच या पोस्टरमधून मिळत आहे. मनसेच्या या आव्हानाला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी 'ये डर अच्छा है म्हणत' जशास तसं उत्तर दिलं आहे. मनसेवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला सुपारीबाज पक्ष म्हटलं आहे. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

वरळीत जर कुणी उमेदवार उभा राहत असेल तर राहू द्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरोधात सगळे मैदानात उभे राहतात. ये डर अच्छा है. सुपारी बाज पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मनसेला लागवला.

वरळीतील पोस्टरवरील मजकूर

वरळीत मनसेने पोस्टरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 'बर्फातला प्राणी बर्फातच पाठवू, संदीप देशपांडे यांना निवडून आणू. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे.' असे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहे. 

Topics mentioned in this article