बदलापुरातील (Akshay Shinde Ancounter) एका प्रसिद्ध शाळेत दोन चिमुरड्यांचं (Badlapur News) लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर देशभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या आणि यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis Poster) यांचे पोस्टर्स व्हायरल झाले आहेत.
नक्की वाचा - 'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र
या पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा पिस्तुल हातात घेतलेला फोटो आहे. त्या पोस्टरवर 'बदला पूरा' असं लिहिलं आहे. या पोस्टरवर पक्षाचं किंवा कोणत्याही नेत्याचं नाव नसल्याने हे पोस्टर्स कोणी लावले असा सवाल उपस्थित केला जात आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत ठिकठिकाणी हे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत.
तर काही ठिकाणी महाविकास आघाडीवर निशाणा साधत भारतीय जनता पक्षाचे काही बॅनर लावले आहेत. ज्यानुसार, महाविकास आघाडीच्या काळात पोलीस सरकारसाठी वसुलीचं काम करीत होती आणि आता पोलीस जनतेची सुरक्षा करीत असल्याचं उल्लेख आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world