जाहिरात

Sumeet Sabharwal Tribute: थरथरत्या हातांनी मुलाला श्रद्धांजली वाहिली, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

Sumeet Sabharwal Tribute: सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव पवई येथील जलवायू विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले.

Sumeet Sabharwal Final Tribute: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 275 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल हे देखील होते. सुमित यांच्या मृत्यूने त्यांचे वडील एकटे पडले आहेत. कॅप्टन सुमित यांचे वडील पुष्करराज यांनी मुंबईतील पवई येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हृदय पिळवटून टाकणारं हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.  

(नक्की वाचा-  Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी)

सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव पवई येथील जलवायू विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. मुलाला अंतिम निरोप देताना वडील पुष्करराज यांना अश्रू अनावर झाले. मुलाच्या पार्थिवासमोर ते हात जोडून उभे होते. सुमित सभरवाल यांनी त्यांच्या वडिलांना नोकरी सोडून पूर्णवेळ त्यांची काळजी घेण्याचे वचन दिले होते. ते वचन अपूर्ण राहिले आहे. 

(नक्की वाचा - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?)

एक मुलगा, एक मार्गदर्शक आणि अनुभवी वैमानिक, कॅप्टन सुमित सभरवाल हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जात होते. आज कुटुंब, मित्र आणि सहकारी त्यांच्या प्रिय वैमानिकाला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. अनुभवी वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. ते निवृत्त होणार होते आणि त्यांच्या वडिलांची पूर्णवेळ काळजी घेणार होते. कॅप्टन सभरवाल यांचे वडील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातून (DGCA) निवृत्त झाले आहेत, तर त्यांचे दोन पुतणे देखील वैमानिक आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com