
- इंडिगो की फ्लाइट 6E 6271 में इंजन नंबर एक में खराबी आने पर पैन..पैन मैसेज भेजकर मुंबई एयरपोर्ट पर इमरजेंसी लैंडिंग की गई.
- पैन..पैन मैसेज एक अंतरराष्ट्रीय इमरजेंसी सिग्नल है जो गंभीर लेकिन जानलेवा स्थिति न होने का संकेत देता है.
- मेडे मैसेज तब भेजा जाता है जब स्थिति जानलेवा हो जाती है और पायलट की सभी कोशिशें असफल हो चुकी होती हैं.
What is Pan Message : दिल्लीहून गोव्याला निघालेल्या इंडिगोच्या विमानाचं मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगदरम्यान वैमानिकाने "पॅन पॅन पॅन" असा मेसेज एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलला दिला होता. विमान वाहतुकीत 'पॅन पॅन पॅन' इमर्जन्सी मेसेज, जो वैमानिक एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) पाठवतात. हा मेसेज अशा वेळी वापरला जातो, जेव्हा विमानासमोर गंभीर परिस्थिती उद्भवली असते, परंतु ती लगेच जीवघेणी नसते.
'पॅन पॅन पॅन' चा अर्थ आणि वापर
'पॅन पॅन पॅन' हा फ्रेंच शब्द 'panne' वरून आला आहे, ज्याचा अर्थ 'समस्या' किंवा 'बिघाड' असा होतो. जेव्हा वैमानिक हा मेसेज देतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की विमानाला एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे उड्डाणाच्या कार्यप्रणालीत बदल करण्याची आणि तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. नुकत्याच मुंबईत इंडिगोच्या फ्लाइट 6E 6271 मध्ये इंजिन क्रमांक 1 मध्ये बिघाड झाल्याने पायलटने हा मेसेज दिला होता. यामुळे एटीसीला तात्काळ समस्या कळते आणि विमान उतरवण्यासाठी आवश्यक मदत व क्लिअरन्स मिळतो.
(नक्की वाचा - IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग)
हा मेसेज एटीसीला केवळ समस्येची सूचना देत नाही, तर विमानाच्या ऑपरेशनल प्राधान्यक्रम म्हणजे, इतर विमानांपेक्षा या विमानाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर सुरक्षितपणे उतरवण्याची व्यवस्था केली जाते. हा मेसेज गंभीर, पण लगेच जीवघेण्या नसलेल्या परिस्थितीसाठी वापरला जातो. यात विमान किंवा प्रवाशांना तात्काळ मोठा धोका नसतो, परंतु तातडीने लक्ष आणि कारवाई आवश्यक असते.
(नक्की वाचा- Pune News : साप, ससे, पोपट... वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर अटक)
कधी दिला जातो 'पॅन' मेसेज
इंजिनमध्ये बिघाड, कमी इंधन, किंवा गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती अशा वेळी पॅन पॅन पॅन हा मेसेज दिला जातो. या स्थितीत पायलटकडे अजूनही विमानावर बऱ्यापैकी नियंत्रण असते. मात्र एटीसीला आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लगेच कळते आणि ते त्यानुसार प्रतिसाद दिला जातो. ज्यामुळे विमानाची आणि प्रवाशांची सुरक्षितता ठरवली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world