Ajit Pawar Funeral: अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी? आज की उद्या, बारामतीत काय घडतयं?

ज्या पद्धतीने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे तशीच तयारी काठेवाडीच्या त्यांच्या शेतात ही केली जात असल्याचं समजत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला
  • अजित पवारांचे पार्थिव बारामती रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत दाखल झाले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे जाताना हा अपघात झाला. त्यानंतर महाराष्ट्रात एकच शोककळा पसरली आहे. देशभरातून नेते, मंत्री, कार्यकर्ते बारामतीकडे निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारावर हा मोठा आघात समजला जात आहे.  शरद पवार हे मुंबईतून बारामतीत दाखल झाले आहेत. तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीतून बारामतीत आले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पवार कुटुंबा सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.  त्यात अजित पवारांवर आज नाही तर उद्या अंत्यसंस्कार होणार हे स्पष्ट करण्यात आलं आहे.  उद्या सकाळी 11 वाजता अत्यसंस्कार होणार आहे. त्या आधी अत्यदर्शनासाठी अजित पवाराचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती राजेद्र पवार यांनी दिली आहे. 

अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. त्यानंतर देश भरातून नेते आणि कार्यकर्ते बारामतीकडे निघाले आहेत. अजित पवारांचे चाहते आणि समर्थक बारामतीत मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. सध्या अजित पवारांचे पार्थिव हे बारामती रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यांच्या मृतदेहाची ओळख ही पटवण्यात आली आहे. अजित पवारांच्या अंत्यसंस्काराची तयारी ही सुरू झाली आहे. त्यांच्यावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या ठिकाणी सध्या तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. 

नक्की वाचा - Ajit Pawar Death : खासदार ते उपमुख्यमंत्रिपदाची विक्रमी कारकीर्द, 'दादां'चा 35 वर्षांचा राजकीय प्रवास

मात्र हे अंत्यसंस्कार आज की उद्या होणार याबाबत स्पष्टता आली नव्हती. काहींच्या मते आज संध्याकाळी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. तर काहींनी हे अंत्यसंस्कार उद्या होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र आता हे अंत्यसंस्कार उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. पवार कुटुंबातील सर्व जण बारामतीत दाखल झाले आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही बारामतीत दाखल झाले आहेत. अंत्यसंस्काराबाबत पवार कुटुंबाकडूनच माहिती देण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Ajit Pawar Accident Live Updates: अजित पवारांचे विमान अपघातात निधन, संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत दाखल

ज्या पद्धतीने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे तशीच तयारी काठेवाडीच्या त्यांच्या शेतात ही केली जात असल्याचं समजत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल ही बारामतीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामतीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरातले नेते बारामतीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठी गर्दी सध्या बारामतीत पाहायला मिळत आहे. 

Advertisement