मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारामध्ये नाराजीनाट्य सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यावरून छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे अजित पवार देखील मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोमवारपासून सुरु झालं आहे. पहिल्या दिवशी अजित पवार गैरहजर राहिले होते. आजही अजित पवार विधानभवनात अद्याप उपस्थित नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासून अजित पवार आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही यावरून नाराज असतानाच अजित पवार गायब झाले आहेत. छगन भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याने ते दूर आहेत का याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
( नक्की वाचा : राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच वळसे पाटलांवर आली वेळ, अजित पवारांनी मंत्रिपद का नाकारलं? )
छगन भुजबळांचा आज कार्यकर्त्यांसोबत बैठक
छगन भुजबळ यांनी नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून "जहा नही चैना वहा नही रहेना" असे सूचक वक्तव्य करत थेट येवला मतदारसंघात पोहोचले आहेत. छगन भुजबळ आज नाशिकच्या भुजबळ फार्मवर आपल्या समर्थकांसोबत चर्चा करणार आहेत. राज्यभरातूनच भुजबळ समर्थक तसेच ओबीसी समाजाचे पदाधिकारी भुजबळ फार्मवर येण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळ साहेबांवर अन्याय झाला असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं भुजबळ समर्थकांचं म्हणणं आहे.
(नक्की वाचा- फक्त 20 रुपयात टक्कल दूर करण्याचा उपाय! इतकी गर्दी की रस्ते झाले जाम, पाहा Video)
भुजबळ समर्थकांनी अजित पवाराच्या प्रतिमेला जोडे मारणे योग्य नाही
राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी म्हटलं की, अजित पवार यांच्या भेटीसाठी मी गेलो होतो. मात्र अजित पवार यांची भेट होऊ शकली नाही. सध्या नाराजी, खातेवाटप, प्रतोद निवडणे या सगळ्या घडामोडी सुरु आहेत, त्यामुळे कदाचित ते संपर्कात नसतील. संध्याकाळपर्यंत कदाचित याबाबत माहिती मिळू शकते. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारणे अशा पद्धतीचे आंदोलन करणे योग्य नाही.