Ajit Pawar News:अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर..रावसाहेब दानवेंनी सांगितली Inside Story

Ajit Pawar News: अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळच्या वेळेस घेतलेल्या शपथविधी सोहळ्याची घटना पुन्हा एकदा चर्चेत आलीय. रावसाहेब दानवेंनी याबाबतचा नवा किस्सा शेअर केलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Ajit Pawar News: अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी सोहळा हा प्रयोग पहिला नव्हे तर..."
PTI

Ajit Pawar News: वर्ष 2019मध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सकाळी-सकाळीच नव्या सरकारच्या शपथविधीचा सोहळा उरकला होता. 23 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी सकाळच्या वेळेस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.  नाट्यमयरित्या घडलेल्या या घडामोडीमुळे राज्याच्या सत्तेमध्ये झालेली ही मोठी उलथापालथ आजही सर्वांच्या चांगलीच लक्षात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा सत्तेचा प्रयोग 80 तासांत फसला आणि अजित पवार स्वगृही येऊन उद्धव ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आलीय. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भातील अजित पवारांबाबतचा कधीही न ऐकलेला किस्सा सांगितलाय. अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, असा दावा रावसाहेब दावने यांनी केलाय. जालन्यातील कार्यक्रमामध्ये उपस्थितांशी संवाद साधताना दानवेंनी ही इनसाइड स्टोरी सांगितलीय.  

(नक्की वाचा: Ajit Pawar News: रक्तरंजित राजकारण! ...तर CCTVतील विमान घिरट्या घालतानाचं फुटेज स्पष्ट कसं? सुषमा अंधारेंचा सवाल)

Photo Credit: PTI

आमचा पहिला प्रयोग फसला... : रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाचा मी अध्यक्ष होतो. शरद पवारांकडून अजितदादा बोलायचे, कधीकधी सुनील तटकरे यायचे. दादांनी जो सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाहीय, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आम्ही तिघं मिळून सरकार चालवू. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेसला बाजूला ठेवून तिघं सरकार चालवू. कोण मंत्री होणार नावंही ठरले, कोणता पालकमंत्री कोणत्या जिल्ह्यानुसार हेही ठरले. पण मोठ्या साहेबांनी नाही सांगितलं, शिवसेना नको आपण दोघं चालवू. हा पहिला प्रयोग होता. दुसराही प्रयोग झाला तोही फसला आणि तिसरा प्रयोग सकाळच्या शपथविधीचा होता, त्यावेळेला मी हजर होतो. तर त्या काळात अनेक घडामोडी झाल्या ना, शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी की 15 ऑगस्ट काहीतरी होतं." दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पहाटेच्या शपथविधीचा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत 

Photo Credit: PTI

(नक्की वाचा: Ajit Pawar: अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी परवानगीशिवाय घडली गंभीर घटना, जर संशयास्पद आढळलं तर...)

अजित पवार यांचे अपघाती निधन

अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) सकाळी विमान अपघातामध्ये निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. त्यांचे विमान जमिनीवर आदळले आणि स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अजित पवारांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवार विमान प्रवासात प्रचंड घाबरले होते, देवाच्या नावाचा करू लागले होते जप, पाहा VIDEO)

Advertisement

VIDEO: Ajit Pawar । Raosaheb Danve । BJP । NCP - पहाटेच्या शपथविधीवरून दानवेंचा नवा दावा