जाहिरात
This Article is From Feb 27, 2026

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताचा ठोस पुरावा AAIB च्या हाती, रिपोर्ट 'या' दिवशी सार्वजनिक होणार

विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) एएआयबीच्या लायब्ररीमध्ये यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे.

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताचा ठोस पुरावा AAIB च्या हाती, रिपोर्ट 'या' दिवशी सार्वजनिक होणार
पुणे:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 'विमान अपघात तपास ब्युरो' (AAIB) या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल 28 फेब्रुवारी  2026 पर्यंत प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. या अहवालामुळे अपघातावेळी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले, याचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या अपघाताच मोठ पुरावा ही यातून AAIB च्या हाती लागला आहे. त्यातून अपघाताच्या प्रत्येक रहस्याचा उलगडा होणार आहे. 

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, 28 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी हा अहवाल सार्वजनिक केला जाईल. अपघाताग्रस्त विमानाचा 'डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर' (CVR) मधील डेटा यशस्वीरित्या संकलित करण्यात आला आहे. हनीवेल कंपनीने तयार केलेल्या या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची तांत्रिक तपासणी सध्या सुरू असून, त्यातून महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यातूनच अपघात नेमका कसा झाला. कॉकपिटमध्ये त्यावेळी नक्की काय घडलं याचा सर्व सारांश समोर येणार आहे. 

नक्की वाचा - Sunetra Pawar: 'दादांकडे जाऊ दिलं नाही, आता वहिनींकडे तरी..' राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील 'ती' Audio Clip Viral

रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, संबंधित 'व्हीआरएस' कंपनीचे मालक अनेक बड्या नेत्यांच्या जवळचे आहेत. या प्रकरणात कोणती तरी 'मोठी हस्ती' सामील असून कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तर मुलगा जय पवार यांनीही ब्लॅक बॉक्सबद्दल शंका उपस्थित केली आहे. आता उद्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालातून अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष आहे. 

नक्की वाचा - Ajit Pawar: दादांच्या विमान अपघाताबाबत CID च्या हाती काय लागलं? 'या' 3 गोष्टी निर्णायक ठरणार

विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) एएआयबीच्या लायब्ररीमध्ये यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे. तांत्रिक तज्ज्ञांमार्फत या माहितीचे विश्लेषण केले जात आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी सुरू असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. रोहित पवार यांनी या प्रकरणात थेट बड्या नेत्यांच्या हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला आहे. उद्याच्या अहवालामुळे हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे इतर काही कारण होते, हे स्पष्ट होईल.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com