Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. दीपावली विशेषांक 2025-2026मधील पान क्रमांक 263 वरील माहिती व्हायरल होतेय. ज्योतिषाचार्य सिद्धेश मारटकर यांनी दीपावली विशेषांकमध्ये डिसेंबर 2025-जानेवारी 2026मधील राजकीय/सामाजिक घडामोडी प्रमुख व्यक्तींसाठी प्रतिकूल काळ-अपघात/घातपात/मृत्यू शक्यता वर्तवली होती. राजकीय व्यक्तीच्या अपघाताचे भाकित सिद्धेश मारटकर यांनी केले होते.
ज्योतिषाचार्य सिद्धेश मारटकर यांनी नेमके काय भाकित केले होते?
ज्योतिषाचार्य सिद्धेश मारटकर यांनी म्हटलंय की, "अष्टमातील मंगळामुळे या काळात मोठे भूकंप, तसेच विमान/ रेल्वे दुर्घटना यातून मोठी हानी संभवते. या योगामुळे धार्मिक स्थळे/ धार्मिक/ राजकीय व्यक्ती यांच्यावर हल्ले, अपघात/ घातपाताच्या दुर्घटना संभवतात. या योगामुळे पोलीस मिलिटरीवर हल्ले होण्याची शक्यता राहील.
बुध-मंगळ योगामुळे या काळात होणाऱ्या वादग्रस्त विधानामुळे मोठे नेते/ व्यक्ती अडचणीत येतील. वादग्रस्त वक्तव्यामुळे धार्मिक/जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता राहील. पक्षप्रमुख, धर्मप्रमुख, प्रमुख पदावरील व्यक्ती, मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे अपघात/ घातपात किंवा मृत्यूच्या घटना संभवतात. मोठ्या पदावरील व्यक्ती या काळात बदलल्या जातील. मोठ्या व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागेल".
"2026मध्ये मोठ्या राजकारणी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो"
दुसरीकडे podcastbabaofficial या इन्स्टाग्राम हँडलवरील व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. ज्योतिषाचार्य अंकित त्यांनी यांनी पॉडकास्ट म्हटलंय की, "देव करो आणि माझी ही भविष्यवाणी चुकीची ठरो. पण मला असं वाटतंय की मोठ्या पदावर असलेला नेता कदाचित आपल्यात राहणार नाही. देव न करो की माझी ही भविष्यवाणी खरी ठरो."
(नक्की वाचा: Ajit Pawar Death: आज आपलं काही खरं नाही,हेलिकॉप्टर हादऱ्यांचा अजित पवारांनी सांगितला होता तो अंगावर काटा आणणारा किस्सा)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार जणांचा बुधवार (28 जानेवारी 2026) सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ भीषण विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील चार सभांना अजित पवार संबोधित करण्यासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. दुर्घटनेमध्ये कॅप्टन सुमित कपूर यांचेही निधन झालंय, त्यांना जवळपास 15,000 तास उड्डाणाचा अनुभव होता. 1,500 तास उड्डाणाचा अनुभव असणाऱ्या को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक, खासगी सुरक्षारक्षक (पीएसओ) विधिप जाधव आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचाही मृत्यूही झालाय.