जाहिरात

Ajit Pawarआज आपलं काही खरं नाही,हेलिकॉप्टर हादऱ्यांचा अजित पवारांनी सांगितला होता तो अंगावर काटा आणणारा किस्सा

Ajit Pawar Death: एका कार्यक्रमासाठी नागपूर ते गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करताना अजित पवार यांना थरारक अनुभव आला होता. तो किस्सा त्यांनी NDTVचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांना सांगितला होता. नेमकं कया घडलं होतं? वाचा सविस्तर...

Ajit Pawarआज आपलं काही खरं नाही,हेलिकॉप्टर हादऱ्यांचा अजित पवारांनी सांगितला होता तो अंगावर काटा आणणारा किस्सा
Ajit Pawar Death: हेलिकॉप्टर प्रवासात थोडक्यात बचावलेले क्षण, अजित पवारांची सांगितला होता तो किस्सा
PTI

Ajit Pawar Death: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर प्रवासातील एक किस्सा स्वतः अजित पवार यांनी एनडीटीव्हीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांना सांगितला होता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरहून हेलिकॉप्टर निघाले होते. मुंबई ते नागपूर स्पेशल चार्टरने प्रवास केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार होते. नागपूरवरून हेलिकॉप्टरने हे दोन्हीही प्रमुख नेते खासगी  साहाय्यकांसह हेलिकॉप्टरमध्ये बसले होते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

अजित पवार म्हणाले मी प्रचंड घाबरलो आणि...

हेलिकॉप्टरद्वारे नागपूरहून गडचिरोलीपर्यंतचा प्रवास अवघ्या 40 ते 50 मिनिटांचा होता. गडचिरोलीमध्ये हेलिकॉप्टर लँड होण्याआधीच प्रचंड दुर्गट वातावरण असल्याने हेलिकॉप्टरला हेलिपॅडचं लोकेशन सापडण्यामध्ये अडचण येत होती. त्यामुळे हेलिकॉप्टर लँड करायला समस्या येत होती. स्वतः अजित पवार यांनी त्यावेळेस नेमकं काय घडलं? हे सांगितलं होतं. अजित पवार म्हणाले होते की, मी आणि मुख्यमंत्री गडचिरोलीसाठी हेलिकॉप्टरने खाली उतरत असताना हेलिकॉप्टरने जोरदार दोन तीन वेळा धक्के दिल्यासारखे झाले. त्यावेळेस मी प्रचंड घाबरलो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते की, आपलं आज काय खरं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना धीर देताना म्हटले की याआधी मी दोनदा हेलिकॉप्टरने वेगवेगळे प्रसंगांमध्ये थोडक्यात बचावलोय. आताही काही होणार नाही, दादा तुम्ही चिंता करू नका. अजित पवार यांच्या मनामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या दिवशी भीती निर्माण झाली होती.  स्वतः अजित पवारांनी हा किस्सा सांगितला होता. दुर्देवाने आज (28 जानेवारी) अजित पवार यांचे विमान प्रवासामध्येच अपघाती निधन झालं.  

(नक्की वाचा: Ajit Pawar Passes Away: विमान कोसळल्यानंतर पुन्हा 4-5 स्फोट झाले, अजित पवारांच्या अपघातात प्रत्यक्षदर्शीने सर्वच सांगितलं)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज, पाहा व्हिडीओ

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: अजित पवारांचे निधन,संपूर्ण महाराष्ट्र सून्न! अपघातग्रस्त विमानाचे एक-एक फोटो पाहताना येईल रडू)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

दरम्यान बुधवारी सकाळी (26 जानेवारी 2026) मुंबईहून बारामतीकडे प्रवास करताना विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. या घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com