Ajit Pawar Memories : अजित पवारांचं 'ते' साईदर्शन ठरलं शेवटचं! साईचरणी 'असं' साकडं घातलं, डोळेच पाणावतील

अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या जात आहेत. अजितदादांच्या शिर्डीतील आठवणींनाही उजाळा देण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ajit Pawar Shirdi Visit Memory

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Ajit Pawar Shirdi Visit : "साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर अंतकरणासह मनाला शांती मिळते, असं साईबाबांचे भक्त सांगतात. अनेक राजकारणीही शिर्डीला जाऊन साईबाबांकडे साकडं घालतात.अजित पवारांचा विमान अपघातात मृ्त्यू झाला अन् संपूर्ण देशात शोककळा पसरली. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या जात आहेत. अजितदादा साईबाबांच्या दरबारात जाऊन मनोभावे दर्शन घ्यायचे आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी साकडं घालायचे. "राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे.."अशी आर्त साद अजित पवारांनी नुकतीच साईंच्या दरबारात घातली होती. परंतु, त्यांच्या निधनामुळे शिर्डीकर आणि अहिल्यानगर जिल्ह्याही शोकाकूल झाला आहे.  दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव येथे प्रचारसभेसाठी अजितदादा शिर्डीत दाखल झाले होते. तेचं अजितदादांचं शेवटचं साईदर्शन ठरलं..

आजोळाचं नातं आणि साईंची ओढ

अजित पवार यांचे आजोळ अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याने त्यांचे या मातीशी रक्ताचे नातं होतं. बालपणापासूनच ते या भागात भेट द्यायचे. राजकीय दौऱ्यांची कितीही धावपळ असली, तरी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दौरा पूर्ण होत नसे.अलिकडेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी शिर्डीला आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी फक्त दर्शनच घेतलं नाही,तर मनोभावे साईबाबांच्या पाद्यपुजेचा विधीबी पार पाडला.

नक्की वाचा >> Ajit Pawar Death: ट्रॅफिकमुळे 'तो' निर्णय घ्यावा लागला अन् होत्याचं नव्हतं झालं, त्या दिवशी काय घडलं?

साईदर्शनावेळी असायचा 'विकासाचा' ध्यास

नेहमीच कामाला देव मानणारे अजितदादा जेव्हा जेव्हा साईमंदिरात यायचे,तेव्हा त्यांच्या डोळ्यांत भक्तीभावासह विकासाची दृष्टी असायची. येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आणखी काय नवीन सुविधा देता येतील? यावर ते संस्थानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या दौऱ्यात असो किंवा राष्ट्रवादीच्या अधिवेशनावेळी,अजितदादांनी नेहमीच शिर्डीला प्राधान्य दिलं. कोपरगावच्या सभेत अजितदादांनी साईबाबांच्या सबका मालिक एक ह्या संदेशाची आठवण करुन देत श्रद्धा आणि सबूरी ठेवण्याचा मंत्र कार्यकर्त्यांना दिला होता.

नक्की वाचा >> Ajit Pawar Death : राज्याचा पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा

स्टेजजवळ घोषणा देणाऱ्या अतिउत्साही कार्यर्त्यांना ते म्हणाले "टीका-टिपणी नको, कामाचं बोला,मी कामाचा माणूस आहे".गुरुवारी सकाळी जेव्हा त्यांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी आणले गेले, तेव्हा 'दादा परत या' अशा आर्त हाका मारत जनसमुदाय ढसाढसा रडला. शिर्डीसह नगर जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती दर्शवली. 
 

Advertisement