Akola News: सरकारच्या 'त्या' कराराविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं, अकोल्यात 36 ठिकाणी रास्ता रोको, प्रकरण काय?

अकोला जिल्ह्यात आज शिवसेना गटाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतमालाचे दर घसरले असून स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Farmers Protest Against Government

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Farmers Strike : अकोला जिल्ह्यात आज शिवसेना गटाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतमालाचे दर घसरले असून स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या करारामुळे आयात वाढून देशातील उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. त्यामुळे हा व्यापार करार तात्काळ रद्द करावा,अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 36 ठिकाणी प्रमुख मार्गांवर रास्ता रोको करून शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी मिळणार?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्यापोटी हेक्टरी 17 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही,असा आरोप करण्यात आला. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.जाहीर केलेली मदत तात्काळ जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याची नाराजीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

नक्की वाचा >> Pune News : पुणे हादरलं! फक्त 20 रुपयांसाठी केलं खतरनाक कृत्य, एकाच दिवशी 2 भयानक घटना घडल्याने नागरिक भयभीत

वाहतूक विस्कळीत; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

यादरम्यान,रास्ता रोकोमुळे अकोला जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असला तरी, ठोस निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केली आहे.